चंद्रपूर, दि. 21 – वासेरा येथील सिंदेवाही तालुक्यातील मौजा जामसाळा (जुना ) येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी जखमी झाला आहे. जोगू तिमाजी रंधये (वय ६५ वर्ष) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. शिवणी वनपरिक्षेत्राअंतर्गत जामसाळा येथील जोगू रंधये हे नेहमी प्रमाणे जनावरे घेऊन जंगलाच्या दिशेने जात होते. यावेळी वाघाने जोगू यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाने जोगू यांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे . गेल्या तीन दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने एका जनावराचाही खात्मा केला होता. या घटनेपासून वनविभागाने घटना स्थळावर कॅमेरे लावले होते. दरम्यान, क्षेत्र सहाय्यक एस. एन. कन्नाके, बीट वनरक्षक ए. एन. मेश्राम, वनमजुरासह वाघाचा शोध घेत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment