Thursday 31 August 2017

‘महा अवयवदान’ लोक चळवळीत सहभागी व्हा


d305481-large
भंडारा,दि.31- रक्तदान व अवयवदान हे पुण्यकर्म आहे. अवयन दानामुळे आपण एकाच वेळी सहा व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. त्याचप्रमाणे अवयव दानाच्या रूपाने जीवंत राहण्याचे भाग्यही लाभते. महाअवयवदान या सामाजिक लोकचळवळीत सर्वांनी सहभागी होऊन अवयव दान करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रविशेखर धकाते यांनी केले. भंडारा चा राजा येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजित संवाद पर्व या कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, डॉ. भगवान म्हस्के, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, भंडारा चा राजा मंडळाचे संयोजक मंगेश वंजारी, मदन बागडे व सुनीलदत्त जांभूळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक कर्ज माफी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात शेतकरी यांच्याशी संवाद साधला यावर आधारित माहिती व जनसंपर्क महासंचालयाने पुस्तिका तयार केली या पुस्तिकेचे संवाद पर्व कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ. धकाते म्हणाले की, शासनाने लोकांच्या हिताच्या अनेक योजना तयार केल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत जन आरोग्याच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. रक्तदान व महा अवयवदान ही आता लोक चळवळ बनली आहे. अवयव दानामुळे आपण एकाच वेळी सहा व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. प्रत्येक व्यक्तीने अवयव दानाचा संकल्प केल्यास गरजू व्यक्तींचे प्राण वाचतील व आपल्याला पुण्य मिळेल असे त्यांनी सांगितले. अवयवदानामुळे आपण मरोणोपरांत जीवन पाहू शकतो. महा अवयव दानाच्या सामाजिक लोक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, जनधन योजना अशा अनेक योजना बँके मार्फत राबविल्या जातात या सर्व योजनांचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी संवाद पर्व कार्यक्रमाचा उद्देश व भुमिका प्रस्ताविकातून विषद केली. गणेश उत्सव काळात गणेश भक्तांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महा संचालनयाच्या वतीने संपूर्ण राज्यभर संवाद पर्व हा अभिनव उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता भंडाराचा राजा प्रतिष्ठानचे खुशाल पराते, किरीट पटेल, मनिष वासनिक, नितीन दुरुगकर, दिलीप बागडे, कैलाश तांडेकर अतुल धुत, सिध्दार्थ गडकरी, प्रदीप वंजारी, निमिष डोकरीमारे, अमोल, घाटोळे, भुमेश मंदुरकर, प्रशांत र्शावणकर, नितीन धकाते, कुमार आकरे, अतुल वंजारी, बंडु वैद्य, छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे बंडुसिंग राठोड, धनश्याम खडसे, सुनिल फुलसुंगे, विजय डेहनकर, घनश्याम सपाटे, रेखाबाई निनावे यांनी पर्शिम घेतले. संवादपर्व या कार्यक्रमास गणेश भक्तांचा उत्स्फरुत प्रतिसाद लाभला. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...