Thursday 17 August 2017

‘दोन शून्यां’च्या चुकीने लाखाचा फटका

मुंबई,17-कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढत असतानाच, काही वेळा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांमुळे मोठा आर्थिक फटका बसण्याचेही प्रकार पाहायला मिळत आहे. लोकल प्रवासात फर्स्ट क्लासचा पास काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या एका प्रवाशास दोन शून्याच्या फरकाने एक लाख रुपयाचा फटका बसला आहे. आता ही रक्कम परत मिळावी, म्हणून त्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
दहिसरमधील विकास मंचेकर हे बोरिवलीतील तिकीट खिडकीवर पास काढण्यास गेले होते. अंधेरी ते बोरिवली फर्स्ट क्लासच्या तिमाही पासासाठी १,३३० रु. देणे आवश्यक होते. पण, क्लार्कच्या चुकीमुळे १,३३० रुपयांऐवजी १,३३,००० रु.रक्कम कापली गेली. हे लक्षात
येताच मंचेकर यांनी ही रक्कम परत मिळविण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा सुरू केला. क्रेडिट कार्डातून ही रक्कम वळती केल्याने बँकेकडून त्यावर व्याज आकारले जाणार असल्याची चिंता मंचेकर यांना भेडसावत आहे. रेल्वेने कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...