Thursday 24 August 2017

दाभोलकर- पानसरेंचे मारेकरी याचे आर्थिक स्त्रोत तपासा-उच्च न्यायालय


मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे संशयित मारेकरी अद्यापही फरारी आहेत. यावरून हा खूप विचारपूर्वक रचलेला कट आहे. फरार आरोपींच्या पाठीशी संघटना भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे या दोघांना पैसे मिळण्याचे स्त्रोताचा तपास करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांना केली. 
दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणी सारंग अकोलकर व विनय पवार हे  दोघे संशयित आरोपी आहेत. गेल्या चार वर्षापासून तपास यंत्रणा त्यांना अटक करू शकली नाही. सीबीआय तसेच विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारच्या सुनावणीत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. विभा कंंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे सादर केलेल्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले की, हे काही एका किंवा दोघांचे काम नाही. संघटना त्यांना आर्थिक मदत करत आहे. अतिशय विचारपूर्वक हे कट रचण्यात आला असून दोन्ही हत्यांचे (पानसरे व दाभोलकर) संबंध आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.
या दोघांना पकडणे अशक्य तर नाहीच; कारण या दोघांचीही पाळेमुळे समाजातच आहेत. एकमेकांना सहाय्य करा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. या दोघांना कोणी आर्थिक मदत करीत असेल, तर त्यांची बँक खाती असणार; त्यामुळे एटीएम, बँक याबाबत विचार करा. केवळ नातेवाईक आणि मित्र यांच्यावर लक्ष ठेवू नका, असे न्यायालयाने सांगितले. गुन्हा घडला त्या दिवशी घटनास्थळाहून सीमावर्ती राज्यांत जाणाºया किती ट्रेन होत्या? या ट्रेनमधून जाणाºयांची यादी बघितली का? तिकिटे तपासली का? या सर्व बाबी लक्षात घेऊन तपास करा. राज्याची सुरक्षा वेठीस धरली गेली आहे. लोकांचा तपास यंत्रणेवरील विश्वास कायम राहिला पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...