Saturday 19 August 2017

नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?

NITESH-RANE-DP
मुंबई,दि.19- गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, ही अटकळ आता लवकरच खरी ठरणार असल्याची शक्यता ‘एबीपी माझा’वृत्तवाहिनीने आपल्या बातमीतून वर्तविली आहे.27 ऑगस्टला अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.काँग्रेसी वातावरणाला कंटाळलेल्या आणि नितेश तसेच निलेश राणेंच्या राजकीय भवितव्याची तरतूद म्हणून राणेंसाठी भाजप हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे सध्या बोलले जात आहे.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले राणे फारसे काँग्रेसमध्ये रमले नाही,त्यांना हवे असलेले मुख्यमंत्रीपद काँग्रेसने दिले नाही,व प्रदेशाध्यक्षपदही दिले नाही,त्यामुळे नाराज असलेले राणेनी आपली व्यवस्था इतर पक्षात करण्यास सुरवात केली होती.राणेंच्या प्रवेशानंतर काँग्रेसला फोडण्यात त्यांना कितपत यश येते याचाही भाजप प्रवेशाच्यावेळी विचार होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...