Tuesday 15 August 2017

सपना नरबळीप्रकरणी सात जणांना फाशीची शिक्षा

यवतमाळ - घाटंजी तालुक्‍यातील चोरांबा येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणातील सात आरोपींना फाशी, तर एका महिलेला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी सोमवारी दिला. 
न्यायालयाने मनोज लाल्या आत्राम, देवीदास आत्राम, यादवराव टेकाम, पुनाजी आत्राम, रामचंद्र आत्राम, मोतीराम मेश्राम, यशोदा मेश्राम यांना फाशी, तर दुर्गा शिरभाते (रा. चोरांबा) हिला पाच वर्षे सक्तमजुरी सुनावली. राज्यात खळबळ उडवून देणारी ही घटना चोरांबा येथे २४ ऑक्‍टोबर २०१३ रोजी घडली होती. दुर्गा शिरभाते हिने अंगात देवी आल्याचे सांगत कुळाचे व गावाचे भले होण्यासाठी मुलीचा नरबळी पाहिजे, असे सांगितले होते. त्यावरून यशोदा मेश्रामच्या सांगण्यानुसार अन्य आरोपींनी सपना गोपाळ पळसकर हिचा दसऱ्याच्या दिवशी बळी देण्याचे ठरविले. २४ ऑक्‍टोबरला त्यांनी सपनाचे अपहरण करून यशोदाच्या घरी आणले. तेथे देवीच्या घटासमोर मंत्रपूजा केल्यानंतर गळा कापून तिचा बळी दिला. त्यानंतर सपनाचे शीर व धड एका पोत्यात भरून खड्ड्यात पुरले. यशोदाच्या सांगण्यावरून दीड महिन्यानंतर सपनाचा मृतदेह बाहेर काढला व लियाकत अन्वर याच्या शेतात पुरला. नंतर पुन्हा तेथून तिची हाडे, कवटी, कपड्याचे तुकडे झुडपात टाकले होते. 
या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे सपनाची आई शारदा व वडील गोपाळ पळसकर हे फितूर झाले. मात्र, ‘डीएनए’ अहवाल पोलिसांच्या बाजूने होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...