भाजप प्रवेश केल्यापासून नाना सरकारविरोधात आवाज उठवित नसल्याचा आरोप त्यांचेवर विरोधक करीत होते. असे असताना नाना पटोले यांनी पहिल्यांदाच फडणवीस सरकारवर जोरदार टीका करीत आपल्या विरोधकांची सुद्धा चांगलीच कोंडी केली आहे. कृषी संकटामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना धडरीत्या सांगता येत नाही, अशी भीति व्यक्त करतानाच राज्यशासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची भानगड सरकारने घालून दिली. त्यात अनेक अडचणी येत आहेत. कर्जमाफीवर अनिश्चितता आहे. कर्जमाफीचे अर्ज खुद्द कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर हे तरी भरू शकतील का? याबाबतही सांशकता असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कर्जमाफीची योजनाच सदोष असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जाचा लेखाजोखा सरकारकडे आहे. हाच लेखाजोखा बँकांकडेही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरायला सांगण्याचा अट्टाहास का? शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू नये, यासाठीच सरकारचा प्रयत्न दिसतोय, असं प्राथमिकदृष्ट्या तरी दिसतंय, असा टोलाही त्यांनी लगावला. सरकारने शेतकऱ्यांच्या मागे ऑनलाइचा ससेमिरा लावल्याने शेतकऱ्यांची परत आर्थिक व मानसिक कोंडी होत असल्याचेही पटोले म्हणाले.
No comments:
Post a Comment