रविवारी ही घटना घडल्याचा स्थानिक माध्यमांनी दावा केला आहे. ऑक्सिजन पुरवठा विभागात कार्यरत असलेला ऑपरेटर कर्तव्यावर असताना दारू पित होता. दारू प्यायल्यानंतर तो झोपी गेला. त्यामुळे या मुलांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. परिणामी, तिन्ही मुलं दगावली, असा दावा माध्यमांनी केला आहे. याप्रकरणाची रमण सिंह यांनी गंभीर दखल घेतली असून तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ऑपरेटरला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या मुलांचा मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यानं झाला नसल्याचं आरोग्य संचालक आर. प्रसन्ना यांनी स्पष्ट केलं.
No comments:
Post a Comment