
71 व्या स्वातंत्र्यदिनी पोलिस ठाण्याच्या आवारात देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पोलिस ठाण्यात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ठाणेदार तटकरे म्हणाले की, देवरीसारख्या नक्षलप्रभावीत क्षेत्रात आपली कामगिरी बजावत असताना पोलिसांवर नेहणी ताण असतो. अशाही परिस्थितीत पोलिस कर्मचाऱ्यांनी कायदा आणि व्यवस्था सुद्धा अत्यंत जबाबदारीने चोख सांभाळली. यामुळे समाजात आपल्या विभागाची प्रतिमा नक्कीच उंचवली आहे. सर्वसमान्य नागरिकांची सुरक्षा हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. यामध्ये आपले कर्मचारी खरे उतरत असल्याचा मला अभिमान आहे. आपल्यापैकीच असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावली असल्याने त्यांचा सत्कार करताना मला समाधान लाभले आहे. उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये हबालदार धर्मपाल भुरे, नितीन शिरपूरकर,प्रेमलाल फुंडे, उषा कुरसुंगे, मिताराम बोहरे, वीरेंद्र मडावी, अनिषा पठाण, कमलेश राऊत, चक्रधर औरासे, संजय बारसे, हंसराज भांडारकर, ज्योती पंचभाई, रंजिता कुंभरे, छाया कटरे यांचा समावेश आहे. दरम्यान, 10 वी व 12वी च्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या पोलिस पाल्यांचा सुद्धा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये देवी टेंभरे, आयुषी तिपुडे, प्रणय नंदागवळी यांचा समावेश आहे. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त कर्माचारी आणि पोलिस कर्मचारी- अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment