Wednesday, 16 August 2017

सोशल मीडियाही मागतोय उत्तर


  मुंबई,16-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येला चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगाआड करण्यात तपासयंत्रणांना यश आले नाही. या दिरंगाईचे नेमके कारण काय आहे, असा थेट सवाल आता अंनिसने ‘जबाव दो’ या मोहिमेद्वारा सोशल मीडियातून उपस्थित केला आहे.
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मॉर्निंग वॉक, जनआंदोलन, पत्रकार परिषदा याद्वारे हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला. कायदेशीर लढाईही सुरू आहे. न्यायालयाने तपास यंत्रणांना स्पष्ट आदेश देऊनही मारेकऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. चार वर्षे उलटूनही या मारेकऱ्यांना का पकडले जात नाही, यंत्रणा इतकी सुस्त का आहे, हे मारेकरी पकडण्यात सरकार दिरंगाई करत आहे का, मारेकऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का, असे थेट प्रश्न ‘जबाब दो’ आंदोलनाच्या माध्यमातून सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...