Tuesday 22 August 2017

जि.प. शिक्षकांच्या बदल्याआता थेट मुंबईतून

औरंगाबाद,22-जिल्हा परिषदेत कार्यरत हजारो शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या. ही प्रक्रिया थेट मुंबईतून ग्रामविकास विभागामार्फत झाली. राज्यभरातील शिक्षकांना मुंबईतून बदली व गाव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेमक्या किती शिक्षकांच्या बदल्या झाल्या याची कुठलीच माहिती नसताना, शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या की नाही हे माहिती न होताच तक्रारी सुरू झाल्या आहेत.
 दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या या जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत होत्या. मात्र, यावेळी बदल्यांचे धोरण बदलले. ग्रामविकास विभागानेच राज्यभरातील शिक्षकांचे बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज मागवून घेतले. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातून अडीच ते तीन हजार शिक्षकांनी अर्ज केले. यामध्ये संवर्ग-१, सवर्ग-२, संवर्ग-३ अशा प्रकारे गंभीर आजारी पती-पत्नी एकत्रिकरणामध्ये ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर. त्याशिवाय विधवा, परितक्त्या, अपंग यांनाही बदल्यांमध्ये विशेष सूट आहे. त्यानुसार शिक्षकांनी अर्ज केले. सर्व अर्ज एकत्रित करून शालार्थ प्रणालीतील मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये बदल्या झाल्या. त्यांना मंत्रालयातूनच पदस्थापना दिली गेली. बदल्यांमध्ये सवलत, सूट मिळावी यासाठी अनेक शिक्षकांनी विविध क्लृप्तींचा वापर केल्याच्या तक्रारी झेडपीच्या शिक्षण विभागाकडे येत आहेत. एका शिक्षकेने एका अपंग मुलाला दत्तक घेऊन अपंग मुलगा दाखविला. काही महिलांनी परितक्त्या असताना पतीसोबत राहात असल्याचे कारण दिले आहे, काहींनी ३० किलोमीटर पेक्षा कमी अंतर असताना ते जास्तीचे असल्याचे दाखविले असल्याची तक्रार मुप्टा शिक्षण संघटनेचे संपत साबळे यांनी सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे प्रभार शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांच्याकडे केली. संबंधितांची व्यक्तिगत पुराव्यानिशी तक्रार करा, निश्चित कारवाई होईल, असे वाणी यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...