Tuesday 29 August 2017

देवरी नगरपंचायतीतील भाजपच्या नगरसेविका बागडे एसीबीच्या जाळ्यात

देवरी,दि.29ेयेथील नगरपंचायतीच्या भाजपच्या महिला नगरसेविका भुमिका आयलेश बागडे व भुषण वंसता आकरे या खासगी इसमाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ लाख रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

तक्रारदार हे दारुव्यवसायिक असून ते नागपूर येथील रहिवासी आहेत.त्यांचे कुमार वाईन शॉप नावाने ३५ वर्षापासून दुकान देवरीत आहे.आधी दुकान राष्ट्रीय महामार्गावर होते.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते दुकान बंद झाले होते.त्यानंतर ऑगस्ट २०१७ पासून ते दुकान शेडेपार मार्गावर त्यांनी सुरु केले.शेडेपार मार्गपरिसराच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका भुमिता बागडे यांनी आपल्या प्रभागात दारुचे दुकान नको यासाठी २५-३० महिलांना घेऊन दारुदुकानावर मोर्चा नेला होता.त्यानंतर तक्रारदाराचे मित्र भुषण आकरे यांनी सांगितले की,नगरसेविका बागडे या दारु दुकानाचा विरोध मागे घेण्यासाठी २ लाख रुपयाची मागणी करीत आहेत.परंतु रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारावर आज सापळा रचण्यात आले असता श्रीमती बागडे यांनी २ लाखाची मागणी करुन तडजोडीनंतर एक लाखाची रक्कम भुषण आकरेमार्फत स्विकारली.यावरुन दोघाविरुध्द देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...