Monday 21 August 2017

पोलिस शिपाई आणि सरपंचासह सात जणांनी केला बालिकेवर अत्याचार

घटना ऐकताच हृदयविकाराच्या धक्क्याने मुलीच्या पित्याचा मृत्यू.
बलिया,21-: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती परिसरात गोपाल नगर येथील एका बालिकेचे अपहरण करून शाळेच्या छतावर बलात्कार केल्याचा संतापदायक प्रकार घडला आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये एक पोलिस शिपाई व गावच्या सरपंचासह सात जणांचा समावेश आहे.
ही अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी जात होती, त्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल धर्मप्रसाद याने सरपंचासह मिळून तिचे अपहरण करून तिला नजीकच्या सरकारी शाळेच्या छतावर नेऊन हा सामूहिक बलात्कार केला. या प्रकारच्या वेळी गावकऱ्यांना कुणकुण लागताच ते तेथे आले, पण त्या वेळी त्यांच्या हाती पोलीस कॉन्स्टेबल लागला. बाकी सर्वांनी पलायन केले. गावकऱ्यांनी त्याला बेदम चोपून पोलिसांच्या हवाली केले. मात्र, या दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांच्या कानावर हा प्रकार जाताच त्यांना जबरदस्त धक्का बसला व त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आरोपानुसार व जबाबानुसार कॉन्स्टेबलला निलंबित करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. अन्य फरारी आरोपींचा शोध चालू आहे तसेच पोलिसांनी छेडछाड आणि पॉक्सो ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस चौकीच्या प्रमुखांनी याबाबत तपासानंतर उचित कारवाई केली जाईल, असे सांगितले..

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...