Wednesday, 9 August 2017

कर्जमाफी रखडली रिझर्व्ह बँकेच्या दारात


 नागपूर,09-राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफी रिझर्व्ह बँकेच्या दारात अडकली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी आम्हाला रिझर्व्ह बँकेचे निर्देश हवे आहेत. ते अद्याप मिळालेले नसल्याची माहिती बँकांनी दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ जूनला ऐतिहासिक कर्जमाफी विविध निकषांसह घोषित केली. राज्यातील सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज या माध्यमातून माफ होणे अपेक्षित आहे.

कर्जमाफीचा शासनादेश ३० जूनला काढण्यात आला. शेतकऱ्यांची एकमुस्त कर्जमाफी होणार असली तरी ती रक्कम राज्य सरकारला बँकेला द्यावी लागणार आहे. ही रक्कम कशी द्यावी, याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे, बँकेला या रकमेची परतफेड करण्यासंबंधीचे नियोजन राज्य सरकारने केले असले तरी कर्जमाफीचे निर्देश बँकांना रिझर्व्ह बँकेमार्फतच जातील. कर्जमाफीपोटी द्यावी लागणारे ३४ हजार ५०० कोटी रुपये उभारण्यासाठी राज्य सरकारची तयारी झालेली नाही. यामुळे राज्य सरकारकडून रिझर्व्ह बँकेला तशी कुठलीही सूचना अद्याप देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचलेला नाही. या कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० हजार रुपये तत्काळ मदत दिली जात आहे. त्यासंबंधीचे निर्देश रिझर्व्ह बँकेकडून बँकांना प्राप्त झाले आहेत. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा हवा आहे. तत्काळ मदतीतही अडचणी येत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...