Monday, 14 August 2017

जदयुत फूट? शरद यादवांना १४ प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा

नवी दिल्ली : जदयुचे वरिष्ठ नेते शरद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विपरीत भूमिका घेतल्यामुळे पक्षात फूट पडणे अटळ मानले जात आहे. असे असले तरीही आपल्याला १४ प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा असून, आपणच जदयुचे खरे नेते असल्याचा प्रबळ दावा शरद यादवांनी रविवारी केला आहे. त्यामुळे नितीश कुमारांपुढे मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे. बिहारमध्ये जदयुने भाजपशी घरोबा करून सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकाकी पडलेल्या शरद यादवांनी वेगळी चूल मांडत थेट जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सद्य:स्थितीत आपल्याला १४ प्रदेशाध्यक्षांनी लिखित पाठिंबा दिला असून, नितीश कुमार केवळ बिहारपुरते मर्यादित उरल्याचा दावा यादवांनी केला. विशेष म्हणजे, पक्ष सरचिटणीस पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...