Tuesday 22 August 2017

ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

gn 21 August, Bemudat Samp

गोंदिया,दि.21(बेरार टाईम्स): आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय ग्रामीण पोस्ट विभागाच्या डाकसेवकांनी १६ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे.दरम्यान गोरेगाव येथील डाक कर्मचाèयांनीही या संपात सहभाग नोंदविला असून तेथील कर्मचारी संपावर बसलेले आहेत. शासनाकडे अनेकदा प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात डाकसेवकांनी निवेदने दिलीत. मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शासनाच्या धोरणा विरोधात डाकसेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे. डाकसेवकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जीडीस कर्मचाèयांचे विभागीयकरण करणे व त्या कर्मचाèयांकडून आठ-आठ तास काम करून घेतात. मात्र, त्यांना नियमित करण्यात आले नाही. तेव्हा अशा कर्मचाèयांना नियमित करण्यात यावे. जीडीएस कर्मचाèयांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावी. जीडीएस कर्मचाèयांना विभागीय कार्यालयातील कर्मचाèयांप्रमाणे सोईसुविधा देण्यात याव्यात. शाखा, डाकघर एबीसीडीच्या आधारावर वर्गीकरण करण्यात येऊ नये. या मागण्यांचा समावेश आहे. बेमुदत संपात संघटनेचे अध्यक्ष कॉ. एम.पी. बेले, उपाध्यक्ष कॉ. बी.डी. ठाकरे, कार्यकारी अध्यक्ष जे.पी. कावळे, सचिव आर.एस. लिल्हारे, कोषाध्यक्ष एन.एस. चोपकर, माजी सर्कल उपाध्यक्ष पी.टी. qसगाडे, एन.एच. कुमेरिया, बी.एफ. बागडे, सहसचिव ए.एम. पाटील, ए.बी. राऊत, बी.के. मेश्राम, एच.एच. सैय्यद, एस.आर. माहारवाडे, उपकोषाध्यक्ष आर.डी. ठवकर, पी.आर. देसाई, जी.टी. वाडीभस्मे, एम.एम. पराते, आर.एफ. साठवणे, बी.के. मुंगमोडे व इतर डाकसेवक सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...