Tuesday 15 August 2017

ध्वजारोहण करून येणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार

चंदीगड,15-चंदीगडमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढण्याचं प्रकरण ताजं असतानाच एका विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही विद्यार्थीनी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे चंदीगडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही विद्यार्थीनी सकाळी शाळेत गेली होती. शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर घरी येत असताना ११ वाजता सेक्टर २३ मधील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क जवळील नाल्याच्या जवळ तिच्यावर बलात्कार करण्यात आला. विद्यार्थीनीवर बलात्कार करणारा आरोपी ४० वर्षाचा असल्याचं सांगण्यात येतं. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो जंगल परिसर असल्याचं सुत्रांनी सांगितलं. ही मुलगी ११ वर्षाची असून शॉर्टकटचा मार्ग म्हणून ती या मार्गाने येत होती.
या प्रकरणी पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिची चौकशी केली असता बरीच माहिती मिळाल्याचे चंदीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक ईश सिंघल यांनी सांगितलं. पीडित मुलीचे आई-वडिल सेक्टर २४ मध्ये राहत असून या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी १०० क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली, असं सूत्रांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...