Tuesday 22 August 2017

पतंजलीला टक्कर देण्यासाठी श्री श्री झाली सज्ज


 मुंबई,22- अल्पावधीतच विस्तार पावलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला बाजारात टक्कर देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) कंपनी सज्ज झाली आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी 'श्री श्री आयुर्वेद' कंपनीने एक हजारहून अधिक दुकाने उघडण्याची तयारी केली असून सुरुवातीला टूथपेस्ट, डिटर्जंट, तूप आणि बिस्कीट्स ही उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

'नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर वाढला आहे. आमचा ब्रॅण्ड हा अन्य कंपन्यांपेक्षा वेगळा असेल. 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) 'श्री श्री तत्व' ही ब्रॅण्ड स्टोअर उघडणार आहे. २००३मध्ये या कंपनीने हेल्थ ड्रिंक्स, साबण आणि मसाले अशी उत्पादनं आणली होती. आता फक्त मॉडर्न रीटेल स्टोअर्स उघण्यात येतील. यासोबत ऑनलाइन विक्रीही कंपनी सुरू करणार आहे. तसंच कंपनी ३०० हून अधिक नवी उत्पादनं बाजारात आणणार आहे. आयुर्वेदिक मार्केट वाढवणं हेच आमच ध्येय आहे. आम्हाला कोणासोबत स्पर्धा करायची नाही आहे. 'श्री श्री तत्व'चे स्टोअर्स पतंजली स्टोअर्सच्या जवळपास असतील', असं 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी सांगितलं.

'श्री श्री तत्व'चे पहिले स्टोअर हे पुढच्या महिन्यात उघडणार आहे. याचबरोबर नोव्हेंबरपर्यंत ५० स्टोअर्स उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं फ्रेंचाइज इंडिया होल्डिंग्सचे प्रमुख गौरव मार्या यांनी सांगितलं. पतंजली कंपनीने फार कमी वेळात भारतीय बाजारपेठेत स्वताःचं स्थान निर्माण केलं आहे. पतंजलीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना हर्बल सेक्टरकडे लक्ष देण्यास भाग पाडलं आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...