Saturday 19 August 2017

जलयुक्त शिवार पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ




नागपूर, दि. 19 : जलयुक्त शिवार अभियानाचे उत्कृष्ठ वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा, विभाग आणि राज्य अशा तीन स्तरावर दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांच्या रोख  रकमेत वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे गावांत झालेल्या सकारात्मक बदलांचे चित्रण समाजासमोर यावे असा उद्देश आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेचे प्रथम वर्ष होते. जिल्हा स्तरावरील पहिल्या तीन पुरस्कारासाठी अनुक्रमे 15, 12 आणि 10 हजार रुपयांचे बक्षिस होते. मात्र बक्षिसाच्या रकमेत आता वाढ करण्यात आली आहे. आता जिल्हास्तरावरील पहिल्या तीन क्रमांकाना 31, 21 आणि 15 हजार रुपयांचे बक्षीस आहे. विभागीय स्तरावरील पहिल्या तीन क्रमांकाना आता अनुक्रमे 50, 35 आणि 25 हजार रुपयांचे बक्षिस मिळेल. राज्य स्तरावरील पहिल्या तीन क्रमांकासाठी एक लाख, 71 हजार आणि 51 हजार रुपयांचे बक्षिस आहे.
जिल्हा स्तरावरील पुरस्कारासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडे, विभागीय पुरस्कारासाठी संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय, जुने सचिवालय, पहिला माळा, नागपूर तसेच उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती यांच्याकडे प्रस्ताव 15 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करण्याचे आवाहन संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...