Wednesday 27 February 2019

ब्लॉसम स्कुल मध्ये जागतिक मराठी दिवस थाटात साजरा

देवरी: 27
ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन जागतिक मराठी दिवस म्हणून साजरा केला .
सदर कार्यक्रमाच्या आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मराठी विभागाचे स्वप्नील पंचभाई, संगीता काळे, कोमल चांदेवार, सरिता थोटे, प्रगती कुंडलकर तसेच इतर शिक्षक या प्रसंगी मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी शुद्ध हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये विध्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता.
मराठी दिनाप्रसंगी उत्सुक विध्यार्थ्यांनी भाषण दिले.
विशेष म्हणजे आजचे शालेय परिपाठ सुद्धा मराठी भाषेत पार पडले.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विध्यार्थी प्रतिनिधी सिद्धी थोटे आणि आर्य चांदेवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशासाठी वैशाली टेटे सह सर्व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली.

सीईओ दयानिधी व जिल्हाधिकारीही बदलीच्या प्रतिक्षेत


गोंदिया,दि.२७~ः  गोंदियाच्या जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ.राजा दयानिधी यांचेही नाव बदलीच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी सुध्दा चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला घेऊन बदल्या होत असल्याचे वृत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सीईओ डाॅ.दयानिधी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचीही चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदावर बदली झाल्याचे वृत्त आहे.
भंडारा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांची बदली मात्र एकाच लोकसभा मतदारसंघात कशी करण्यात आली याबद्दल प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी 3 मतदारसंघ येत असून गोंदियाचा फक्त 1 मतदारसंघ गडचिरोली-चिमूर मतदारसंघात येत आहे. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा व लोकसभा मतदारसंघावर त्या अधिकाऱ्याचा प्रभाव पडता कामा नये, यासाठी स्थानांतरण करण्यात येत असताना श्रीमती साहू या तर पूर्वीपासूनच या मतदारसंघात कार्यरत राहिलेल्या असल्याने त्यांचा प्रभाव पडणार नाही का ? असे प्रश्न पोलिस प्रशासनात चर्चेला आले आहेत.

27 फेबुवारी ते 05 मार्च 2019 चा बेरार टाईम्स अंक http://berartimes.com/





Tuesday 26 February 2019

वैष्णवी गभणे हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

वैष्णवी गभणे हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

अवैध वाळूची तस्करी करणाऱ्यांवर पुन्हा कार्यवाही

देवरी,दि.26 - तालुक्यातील शिलापूर घाटावरून आणि मुरदोली परिसरातून होत असलेल्या अवैध वाळू तस्करांवर आज सकाळी ९ च्या  सुमारास तालुका प्रशासनाने धाड टाकून तीन लाख सहा हजाराचा महसूल गोळा केला. सदर कार्यवाही तहसीलदार विजय बोरुडे यांनी केली.प्रशासनाला शिलापूर रेती घाटावरून अवैध वाळू उपसा व वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने आज तहसीलदार विजय बोरूडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घाटावर धाड टाकली या धाडीत पुराडा येथील सुकचंद भेलावे याचे मालकीचे 1 ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना पकडले. ही कारवाई सकाळी 8 वाजताच्या सुमारास करण्यात आली. यानंतर सकाळी नऊच्या सुमारास चिचेवाडा परिसरातील मुरदोली नजीक प्रशांत बोरकर रा शेंडा यांच्या मालकीचे 2 ट्रॅक्टर जप्त केले. यामध्ये प्रशांत बोरकर राहणार  शेंडा  २ ट्रॅक्टर या वाहनावर जप्तीची कार्यवाही करून एकूण ३ लाख ६ हजार रुपयांचा दंड ठोठावला 

तहसिलदार मेश्राम व भंडारी यांना निरोप

गोंदिया,दि.26ःः गोंदिया जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी राहिलेले गोंदिया शहरचे अप्पर तहसिलदार के.डी.मेश्राम व सालेकसा येथील तहसिलदार भंडारी यांचा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नागपूर व कोरची येथे बदली झाल्यानिमित्ताने त्यांचा निरोपसमारंभ कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
 निरोप सभारंभाला नायब तहसिलदार सिंगाडे,नायब तहसिलदार अटराहे,मंडळ अधिकारी भेंडारकर, वर्मा, तिवारी,शर्मा,पोरचिट्टीवार, सुनिल राठोड तलाठी ,बोडखे,बिसेन,तुर्क,आशिष रामटेके,बिसेन, बोरकर व समस्त महसुल कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन तलाठी सुनिल राठोड यांनी केले.

लघु वृत्तपत्र बचाव संघर्ष समितीच्या निवेदनाची ना. बडोले यांनी घेतली दखल




गोंदिया,दि.२६–लघु वृत्तपत्र बचाव संघर्ष समितीच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत महासंचालक माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र शासन यांना निवेदन दिले जाणार आहे. निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील क वर्ग दैनिक व साप्ताहिकांच्या संपादकांनी जिल्हा माहिती अधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी सकाळी ११.३0 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन लघुवृत्तपत्र संपादक संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरीय शासनमान्य लघु वृत्तपत्रे दैनिके व साप्ताहिकांना संपुष्टात आणण्यासाठी वेगवेगळे दबाव तंत्र सुरू केल्याने आगामी भविष्यात राज्यातील अनेक लघुवृत्त पत्रे व साप्ताहिके बंद पडून हजारो कामगार बेरोजगार होतील. शासनाने या संदर्भात दखल घेऊन अन्यायकारक धोरण रद्द करावे. या सोबतच महाराष्ट्र शासनाने १ जानेवारी २0१९ पासून नवीन शासकीय संदेश प्रसार नियमावली २0१९ अंमलात आणली आहे. यातील जाचक अटी कमी करण्यात यावी व गोंदिया जिल्ह्यातील मागील सहा महिन्यापासून रिक्त असलेले जिल्हा माहिती अधिकार्‍याचे पद त्वरीत भरण्यात यावे. या मागणीसाठी गोंदिया जिल्हा लघु वृत्तपत्र बचाव संघर्ष समिती गोंदियाच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांना लघु वृत्तपत्र बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना पत्रकार एच.एच. पारधी, चंद्रकांत खंडेलवाल, अतुल दुबे, जयंत शुक्ला, भगत ठकरानी यांचा समावेश होता.
पालमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी या निवेदनाची दखल घेत माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालकाशी भ्रमणध्वनीने संपर्क करून गोंदिया जिल्ह्यातील कुठल्याही लघुवृत्त पत्र व साप्ताहिक वर अन्याय होणार नाही याची दखल घेण्यास सांगितले.
पत्रकारांनी निवेदनाच्या माध्यमातून अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने यांचे १३ फेब्रुवारी २0१९ चे पत्र रद्द करण्याची मागणी केली असून १ जानेवारी २0१९ मधील नवीन धोरणातील अन्यायकारक अटी रद्द करण्यात याव्यात तसेच जिल्हा महिती अधिकारीचे पद मागील सहा महिन्यापासून रिक्त असल्याने पत्रकार व संपादकाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी या पदावर त्वरित नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री ना. बडोले यांनी निवेदनाची दखल घेत कुणावर ही अन्याय होणार नाही असे आश्‍वासन दिले आहे.

पोलिस, वनविभागाने अडविले तीन गावांतील नागरिकांना

गोंदिया,दि.२५ : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने सोडविण्यात यावे, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा ईशारा प्रशासनाला दिला होता.
 त्यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री ते वरीष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिले होते. मात्र प्रशासन आणि शासनाकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. परिणामी श्रीरामपूर येथील आणि पूर्वाश्रमीचे कलवेवाडा, झंकारगोंदी आणि कालीमाती या गावांतील महिला, पुरूष आणि लहानग्यांनी आज(दि.२५) सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या गावाकडे कूच केले. परंतु यामुळे परिस्थिती चिघळून नाचक्की होईल, या हेतूने वनविभागाने पोलिस बंदोबस्त तैनात केला. जंगलात जाण्याच्या प्रवेशद्वारावर ताराचे कुंपण करण्यात आले. सुमारे तीनशे पोलिस आणि वनविभागाचे शंभरावर कर्मचारी तैनात करण्यात आले. त्या प्रकल्पग्रस्तांना जंगलात जाण्याला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे दुपारी १२ वाजताच्या सूमारास तणावाची स्थिती निर्माण झाली. प्रकल्पग्रस्तांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता तिथेच चटई टाकत बस्तान मांडले. वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून आधी मागण्यांची पूर्तता करणार अन्यथा ईथून हलणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. तीन वाजताच्या सूमारास गोंदियाचे उपवनसंरक्षक श्री युवराज यांनी प्रकल्पग्रस्तांशी बोलणी केली. परंतु, आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही आंदोलन करणार नसल्याचे सांगताच उपवन संरक्षकांनी देखील त्या मागण्या पूर्ण करणे आपल्या हातात नसल्याचे प्रकल्पग्रस्तांना सांगीतले. त्यामुळे उपवनसंरक्षकांना देखील हतबल होत चर्चा विफळ ठरली. कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यामुळे सायंकाळपर्यंत प्रकल्पग्रस्त नागरीक ठाण मांडून जंगलात बसले होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी,पाचशे सुरक्षारक्षकांचा ताफा
श्रीरामपूरवासीयांनी टोकाची भूमिका घेत आंदोलन सुरू केले. डोळ्यासमोर निवडणुका आहेत. त्यामुळे प्रशासन आणि शासनाला देखील घाम फुटला. आंदोलन पांगविण्याकरिता गप्प बसा अन्यथा खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्याची धमकी देखील वन विभागाचे अधिकारी देत असल्याचा आरोप श्रीरामपूर येथील नागरिकांनी केला.आज सोमवारी आपण आपल्या मू‌ळ गावी परतणार असल्याचा ईशारा श्रीरामपूर येथील नागरिकांनी दिला होता. यातून प्रशासनाची नाचक्की होणार असल्याचे लक्षात येताच वनविभागाने पोलिसांचा बंदोबस्त लावला. सुमारे तीनशे पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. गावात जाण्याच्या मार्गावर तारांचे कुंपन टाकून त्यांची वाट अडविण्यात आली. अधिकारी आणि गावकऱ्यांचा बाचाबाची झाल्यानंतर पोलिस लाठीचार्ज करतात की काय अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती.
मुलाबाळांसह ६०० नागरिकांचा समावेश
श्रीरामपूर येथील महिला आणि पुरूष आपल्या लहानग्या बाळांना घेवून आपल्या जंगलात असलेल्या गावाकडे निघाले होते. दिवसभर लहान मुले भूक आणि तहानेने व्याकूळ झालेले दिसून आले. मात्र निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने रस्ता अडवून धरला असला तरी लहान मुलांकरिता साध्या पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही.

कृषी महोत्सवातील गावराण कोंबड्याचे मटण ठरतेय नागरिकांची पसंती

गोंदिया,दि.25-बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे, कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी, तसेच त्याना प्रोत्साहन मिळण्यासोबतच प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण व्हावी, यासाठी गोंदिया-आमगाव मार्गावरील नागपूरे बगीचा परिसरात आयोजित कृषी व पलाश महोत्सवाचे आयोजन गेल्या दोन दिवसापासून करण्यात आले आहे.
या आयोजनात गावखेड्यातील बचतगटासंह वैयक्तिक लाभार्थी शेतकर्यांनाही स्टाॅल लावण्याची संधी मिळालेली आहे. कृषी साहित्य, भाजीपाला, शेतीपुरक साहित्यासह इतर स्टाॅलला ज्याप्रमाणे गर्दी असते तीच गर्दी मात्र यावेळी सुमारे 10-15 संख्येत असलेल्या भोजनालयाच्या स्टाॅलवरही बघावयास मिळते. त्यातही गोंदिया शहर परिसरातील या महोत्सवात अवघ्या 50 रुपयात फुलप्लेट गावरान देशी कोंबड्याची मटन करी आणि मासोळीची भाजी नागरिकांच्या पंसतीला पडली असून दुपारपासून रात्री कार्यक्रम संपेपर्यंत या स्टाॅलकडे बहुतांश व्हिजीटर सहकुटुंब या देशी कोंबडीच्या मटनाचा आस्वाद घेतांना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे गोंदिया शहरातील अनेक हाॅटेलात देशी चिकनच्या नावावर बायलर किंवा काॅकरेलचे चिकन दिले जाते ते सुध्दा 100 ते 150 रुपये प्लेटच्याही वर. मात्र या कृषी महोत्सावत गावातून आलेल्या या महिला बचतगट व कुक्कुटव्यवसायिकांनी अवघ्या 50 रुपये प्लेटमध्ये आपल्या घरातील स्वाद मिळेल असे देशी चिकन उपलब्ध करुन देत असल्याने एकच गर्दी बघावयास मिळत आहे. त्यातच रात्रीला ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य व नाटिका महिला बचत गटाच्या सदस्या सादर करतांना दिसून येत आहेत. अवघे दोन दिवस समारोपाचे उरलेल्या या कृषी महोत्सावचा लाभ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक पर्वणी ठरत असून शहरवासियांसाठीच नव्हे तर खवय्यासांठीही आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे.

ग्रामसेवकांचे निलंबन मागे घ्या,ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन सुरु

गोंदिया,दि..२५ : शेतकरी सन्मान योजनेची कामे न करण्याचा ठपका ठेवत निलंबीत करण्यात आलेल्या ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
 याप्रसंगी युनियनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.२२ तारखेपासून ग्रामसेवकांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची कामे केली नाहीत. सोमवारी (दि.२५) करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर ग्रामसेवक युनियनने निवेदन देत टप्याटप्याने आंदोलन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला सूचीत केले आहे. यांतर्गत मंगळवारपासून (दि.२६) पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सर्वच प्रकारच्या सभांवर बहिष्कार घालून कोणतेही अहवाल न देता असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.४ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सचिव कामकाज बंद करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या चाब्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (पंचायत) दिल्या जातील. ५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषदेसमोर बेमूदत आंदोलन सुरू करणार असून त्यापुढील आंदोलन राज्यस्तरीय मार्गदर्शनात ठरविले जाणार आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची ६४ टक्के कामे करूनही तिरोडा येथील ग्रामसेवकावर सुडबुद्धींनी निलंबनाची कारवाई करण्यात आली.एवढेच नव्हे तर गोंदिया येथील तहसीलदारांमार्फत ६ ग्रामसेवकांनी काम करूनही काम न केल्याचा खोटा अहवाल सादर करण्यात आला.या योजनेत तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक व विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिवांची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र हेतूपुरस्सर ग्रामसेवकांना टार्गेट केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुुळे ग्रामसेवकांमध्ये रोष व्याप्त आहे. यांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण,जिल्हाध्यक्ष व विभागीय सचिव कमलेश बिसेन,सचिव दयानंद फटिंग, सचिन कुथे, कविता बागडे, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ.के.रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परेश्वर,योगेश रुद्रकार,पांडुरंग हरिणखेडे,परमेश्वर नेवारे, यांचा समावेश होता.

Monday 25 February 2019

काँग्रेसचा देवरी उपविभागीय कार्यालयावर धडकला मोर्चा



देवरी,दि.२५ ः-देवरी तालका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आज २५ फेब्रुवारीला शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षीत बेरोजगार व ट्रॅक्टर संघाच्या सदस्यांचा येथील परसटोलावरून मार्गभ्रमण करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करा, वर्ष २0१५-१६ मध्ये जाहीर केलेल्या ८४ गावांचा दुष्काळ निधी त्वरित वाटप करा, वर्ष २0१७-१८ मध्ये कोरड्या दुष्काळाची हेक्टरी २५ हजार रूपये मदत, शेतकर्‍यांना दुष्काळ निधी व पीकविम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, डिमांड भरलेल्या शेतकर्‍यांना वीज कनेक्शन त्वरित देण्यात यावे, अतिक्रमणधारकांचे थांबलेले पट्टे त्वरित देण्यात यावे, तसेच ग्रामपंचायत मिसपिरी व पिपरखारी येथील लोकांना जन्म-मृत्यूची नोंदणी उपलब्ध करून देण्यात यावी, रेतीघाट लिलाव करण्यात यावे, या मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात गोंदिया जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम बाबा कटरे, माजी जिप अध्यक्ष टोलसिंग पवारन, माजी आ. रामरतन राऊत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, उषा शहारे, राधेश्याम बगडीया, दीपकसिंह पवार, माधुरी कुंभरे, संगीता भेलावे, लखनी सलामे, नरेंद्र मडावी, वसंत पुराम,तालुका कॉंग्रेवचे अध्यक्ष संदीप भाटीयासह मोठ्या संख्येने शेतकरी,शेतमजुर बेरोजगार युवक सहभागी झाले होते.

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त देवरीत महाप्रसाद

देवरी: 25
गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त देवरी येथील गणेश चौकात स्थित गजानन महाराज मंदिरात कुंडलेकर दाम्पत्याकडून दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
या वर्षी सुद्धा दि.25 सायंकाळी 7 वाजता महाप्रसादचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मध्ये देवरी येथील नवयुवक किसान गणेश मंडळ महत्वाची भूमिका बजावणार आहे अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बेरार टाइम्सशी बोलतांना सांगितले.

BSNL टाॅवर एक, कनेक्शन धारक अनेक

देवरी:फुक्कीमेटा:-५/६ गावो में B S N L कनेक्शन धारक नेटवर्क कमजोर रहने कि परेशानियों से जूझ रहे हैं।।
    प्राप्त जानकारी अनुसार शहर में  BSNLकनेक्शन धारक लगभग 1500 से 2000 के बीच हैं और B S N L फोन धारक लगभग 500 है परंतु कुछ महीनों से B S N L  कनेक्शन दिनोंदिन कमजोर होता जा रहा है जिस कारण इन कनेक्शन धारकों को दिक्कतें आ रही है कुछ कनेक्शन धारकों ने तो अपना B S N L सिम निकालकर दूसरा कंपनी का सिम का इस्तेमाल सूरू कर दीया हैं परंतु इस बीच ईन  कनेक्शन धारकों ने जो रिचार्ज मारा था वह data व्यर्थ जा रहा है जिस कारण ,देवरी शहर क गावो मेे B S N L कनेक्शन धारकों का रिचार्ज में लगी रकम  यूं ही बर्बाद हो रही है ।
      प्राप्त जानकारी अनुसार देवरी शहर में शुरुआत से ही B S N L कंपनी का एक ही टाॅवर उपलब्ध है (बाकी दुसरे कपंनि के टावर है)और कनेक्शन धारकों की संख्या हजारों में होने से यह सारी परेशानी कनेक्शन धारकों को हो रही है .और कनेक्शन कमजोर पड़ता जा रहा है ।।
BSNLकंपनी ने देवरी शहर के गोवोमें होल्डिंग व जाहिरात के माध्यम से प्रचार प्रसार किया है परंतु शहर में नेटवर्क मे कोई भी सुधार नहीं कर पाई है । दिनोंदिन नेटवर्क  कमजोर होने लगा है।
    BSNL कनेक्शन धारको ने BSNLकंपनी से जल्द से जल्द दूसरे टाॅवर की व्यवस्था करने की मांग की  है ताकि उन्हें नेटवर्क ठीक-ठाक मिल सके|

तहसीलदार बोरुडे याची रेती माफीयांवर कारवाई

देवरी,दि.24 - तालुक्यातील शिलापूर घाटावरून होत असलेल्या अवैध वाळू तस्करांवर आज तालुका प्रशासनाने धाड टाकून साडे सहा लाखाचा महसूल गोळा केला. सदर कार्यवाही तहसीलदार विजय बोरुडे यांनी केली.

प्रशासनाला शिलापूर रेती घाटावरून अवैध वाळू उपसा व वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने आज तहसीलदार विजय बोरूडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घाटावर धाड टाकली या धाडीत अवैध वाहतूक करणारे 2 टीप्पर आणि 4 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ही कारवाई सकाळी आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या सहाही वाहनावर जप्तीची कार्यवाही करून एकूण 6 लाख 38 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला.


गोंदियाच्या पोलीस अधिक्षकपदी विनीता साहू तर भंडाèयाला साळवे


गोंदिया पोलीस अधिक्षक बैजल यांची धुळे राज्य राखीव दलाच्या समादेशक पदावर बदली
गोंदिया,दि.२५ः-लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधिक्षकांच्या बदल्या झाल्या असून गोंदियात गेल्या सहा आठ महिन्यापुर्वीच आलेले पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांची धुळे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६च्या समादेशक पदावर करण्यात आली.तर त्यांच्या जागेवर भंडारा पोलीस अधिक्षक श्रीमती विनिता साहू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वास्तविक बैजल यांच्या कार्यकाळात गोंदिया पोलीसांनी वाहतुकीच्या क्षेत्रात चांगले कार्य केले.सोबतच वाहनचालकांना हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्यासाठी सुरु केलेली मोहीमेलाही विरोधासोबत नागरिकांनी प्रतिसाद दिला.तर गोंदियाच्या मृत फुटबॉलसामन्यांना त्यांनी राज्यस्तरीय शहिद फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून नवी ऊर्जा मिळवून दिली यात शंकाच नाही.त्यांची अल्पावधीतील कारकिर्द ही एक चांगली राहिलेली आहे.प्रसारमाध्यमांशीही सातत्याने संपर्क ठेवणारे व प्रत्येक घटनेची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी संपर्क ठेवला होता.
गोंदियाच्या नवनियुक्त पोलीस अधिक्षक विनिता साहू या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातच असल्याने त्यांना गोंदिया काही नवीन राहिलेले नाही.त्यातच गेल्या अनेक वर्षापासून त्या भंडारा येथे पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत असून त्यांचीही कारकिर्द चांगली राहिलेली आहे.त्यांच्या काळातही भंडारा पोलीस विभागाचे नाव राज्यपातळीवर पोचलेले आहे.राजकीय नेत्यासोंबतच राजकीय पक्षाना कसे सांभाळून घ्यायचे याची कला साहू मॅडम यांच्याकडे असल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांची गोंदियातील निवड महत्वाची ठरणार आहे.तर भंडारा पोलीस अधिक्षक पदावर मुबंई येथील सुरक्षा व अमलबजावणी विद्युत वितरण कपंनीचे पोलीस अधिक्षक अरqवद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sunday 24 February 2019

दुष्काळ,नोकरभरतीसह विविध मुद्यावर सरकारला घेरणार-विरोधी पक्ष

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.24 : शिवसेना – भाजपाची युती ही भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत युती केली आहे. एकेकाळी ज्यांना अफजल खान म्हटले, त्यांनाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिठ्या मारल्या, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.पत्रपरिषदेला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंढे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत चव्हाण,आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपासह शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेना – भाजपाची युती ही भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेने युती केली आहे. तसेच, निवडणुकी आधीचे अधिवेशन म्हणजे युती सरकार आपल्या जाहीरनाम्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वापर करणार आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या मार्चमध्ये होण्याची शक्यता असल्याने उद्यापासून ६ दिवस राज्याचे लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात सरकारला दुष्काळाच्या प्रश्नावर जाब विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. यासोबतच, धनगर आणि मुस्लीम आरक्षणावरही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर, भाजपा सरकारच्या काळात राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकरी अनुदानाचे नवे गाजर सरकारकडून दाखविण्यात आले. सरकारची पीक योजना फसवी निघाली. त्यामुळे आता सरकारच्या या फसव्या घोषणांना जनता बळी पडणार नाही, असे सांगत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.गेल्या वर्षी २८ मार्च २०१८ मध्ये ७२ हजार नोकरभरतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले. तरी सुद्धा एकही जागा भरलेली नाही. आता आचारसंहितेच्या तोंडावर पुन्हा नोकरभरतीचे गाजर सरकार दाखवणार आहे, असा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार होते. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मार्चमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने हा निर्णय सरकारला बदलावा लागला आहे. केवळ ४ महिन्यांच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल सी. विद्यासागर हे अधिवेशनापूर्वी अभिभाषण करणार आहेत. अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधक सरकारला धारेवर धरण्याची तयारी करत आहेत

गोदामावर धाड, दीड लाखाच्या पॉलिथीन पिशव्या जप्त

गोंदिया,दि.24ः-शहरातील सर्कस मैदान परिसरातील एका गॅरेजमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व नं.प.ने संयुक्तरित्या कारवाई करून प्रतिबंध असलेले १५00 किलो पॉलिथीन पिशव्या जप्त केल्या. ही कारवाई २१ फेब्रुवारीच्या दुपार दरम्यानची आहे. राज्यात पॉलिथीन पिशव्या व त्याच्या उपयोगीतेवर बंदी लावण्यात आली आहे. बंदी असून देखील शहरात मोठया प्रमाणात पॉलिथीन व डिस्पोजलचा वापर होत असल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान शहरातील मोक्षधाम मार्गावरील सर्वष्ठस मैदाना जवळील ब्राईट गॅरेजच्या गोदामावर धाड टाकून १५00 किलो प्रतिबंधीत असलेले प्लास्टिक जप्त केले असून याची अंदाजे किं मत दिड लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच गॅरेज मालकावर ५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ भंडाराचे निरीक्षक महेश भिवापुरकर तसेच गोंदिया नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख गणेश हथकैय्या,आरोग्य निरीक्षक प्रफुल पानतावणे, मनीष बैरीसाल, मुकेश शेंद्रे, कनिष्ठ अभियंता सुमेध खापर्डे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक प्रतिक मानकर यांनी केली.

जैतपूर येथे संविधान बचाव संघर्ष समितीचे धरणे

लाखांदूर,दि.24 :  तालुक्यातील जैतपूर येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात संविधान बचाव संघर्ष समितीचे एक दिवसीय शाखास्तरावरील धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्रा.अनिल कान्हेकर होते. प्रमुख अतिथी प्रा.स्वप्नील वासनिक, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर पठाण उपस्थित होते. या संविधान बचाव समितीद्वारे पूर्ण देशभरातील ५५० जिल्हास्तरावर ४५०० तालुकास्तरावर व ५०००० ब्लॉक स्तरावर चरणबद्ध पद्धतीने विरोध प्रदर्शन करण्यात आले. केंद्र सरकारने घटनेच्या विरोधात दिलेली १० टक्के आर्थिक आधारावरील आरक्षण बंद करण्यात यावे, ईव्हीएमवरील मतदान बंद करण्यात यावे, ओबीसी जातीनिहाय जणगणना करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रा.अनिल कान्हेकर म्हणाले, केंद्र सरकारने आर्थिक आधारावर दिलेले १० टक्के आरक्षण घटनाबाह्य आहे. या विषयावर सविस्तर माहिती समजावून सांगितली व आरक्षण हे प्रतिनिधीत्व आहे. ते सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर दिले जाते. ते पुढे म्हणाले, ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीत कसे घोटाळे होतात व लोकशाही कशी धोक्यात आली आहे, या मुद्यांवर माहिती दिली. शब्बीर पठाण यांनी सर्व बहुजन, एससी, एसटी, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांकांना एकत्रित होण्याचे व या व्यवस्थेविरोधात उभे राहून लढा देण्याचे आवाहन केले.
संचालन किशोरदत्त सतीमेश्राम यांनी केले तर भाग्यवान सोनपिंपळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
धरणेसाठी नवनीत गराडे, कुणाल ठवरे, कार्तीक वडस्कर, भारतलाल वडस्कर, रेश्मा शेंडे, बुद्धघोष दहिवले, केतकी देव्हारे, वर्षा लंजे, सायली शेंडे, खुशबू मेश्राम, प्रियंका सोनवाने, अश्विनी सोनवाने, युवराज भुरले, धर्मेंद्र मेश्राम,ह र्ष बोरकर, स्वप्नील टेंभुर्णे, आकाश टेंभुर्णे तथा गावकºयांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.स्वप्नील वासनिक यांनी मानले. मागण्यांचे निवेदन अधिकाºयांना सोपविल्यानंतर धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.

आ.रहागंडालेंच्या मागणीला यश:मुख्यमंत्र्यांनी 500 रुपये प्रतीक्विंटल केली बोनसची घोषणा


तिरोडा/साकोली,दि.23-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध कामाच्या लोकार्पण व भूमिपूजनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजय रहागंडाले यांच्या धानाला 500 रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याच्या मागणीवर बोलतांना धानाला बोनस आणि  मासेमारांना मदत तिरोडा येथे नाही तर मी सेंदुरवाफा येथील सभेत जाहीर करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.त्यानंतर साकोली तालुक्यातील सेंदुरवापा येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी बोलतांना धानाला प्रतीक्विंटल 500 रुपये बोनस देण्याची घोषणा केली.ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील साकोली व  तिरोडा विधानसभा मतदारसंघातील  विविध कामांच्या भूमिपुजन सोहळ्याकरीता आले असतांना आज(दि.23) बोलत होते.

यावेळी केंद्रीय जहाजबांधणी मंत्री ना. नितीन गडकरी,गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले,भंडारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले,साकोली आमदार बाळा काशीवार,तुमसर आमदार चरण वाघमारे,भंडारा आमदार यांच्यासह माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,प्रदिप पडोळे,माजी आमदार केशव मानकर,खोमेश रहागंडाले,भजनदास वैद्य,हरिष मोरे,नगराध्यक्ष आशिष बारेवार,अशोक इंगळे,उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर,सुरेश रहांगडाले,पंकज रहागंडाले,रविकांत बोपचे,डाॅ.लक्ष्मण भगत व इतर मान्यवर मंचावर सेंदुरवापा व तिरोडा येथील कार्याक्रमात उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित एका सोहळ्यात  धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 सह विविध रस्ते आणि बांधकामाचे भूमीपूजनसह लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तिरोडा येथे जाहिर न करता सेंदुरवाफ्याच्या सभेत करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.त्यानुसार सेंदुरवापा येथील सभेत त्यांनी धानाला बोनस जाहिर केले.

आमदार विजय रहागंडाले यांनी आपल्या प्रास्तविकात धापेवाडा योजनेचे सिंचन क्षेत्र हे ५०० हेक्टरवरुन 10 हजार हेक्टर झाल्याचे सांगत २०२० पर्यंत तिरोडा विधानसभा मतदारसंघ हा सिचंनात क्रांती करणार असून निधीची असलेली कमतरता पुर्ण करण्याची मागणी केली.तसेच गेल्या १५ वर्षात रखडलेली सिंचनक्रांती अवघ्या तीन वर्षात २७ हजार ८०० हेक्टरवर पोचल्याचे सांगितले.सोबतच निमगाव सिंचन प्रकल्पाचा केंद्रातील प्रश्न सोडविण्याची मागणी करीत धानाला 500 रुपये बोनस देण्याची जाहिर मागणी केली. त्या मागणीचा मुद्दा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकोली तालुक्यातील सेंदुरवापा येथे आयोजित सभेत धानाला बोनस जाहिर केले.तिरोडा येथील कार्यक्रमाला 10 हजाराच्यावर नागरिकांची हजेर होती.संचालन माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले व मंजुश्री देशपांडे यांनी केले.

परीक्षेस उशीर झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारला, पतीचा हृदयविकाराने मृत्यू

नांदेड,दि.23ः-कृषी सहायक पदाच्या परीक्षेत केवळ पाच मिनिटाचा उशीर झाल्याने पत्नीस परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारल्याने मानसिक तणावातून पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज शहरापासून जवळच असलेल्या होरायझन शाळेत घडली.या मृत्यूस शाळेचे व्यवस्थापन जबाबदार असून व्यवस्थापनावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील मुक्ता देशमुख यांची आज शहरापासून जवळच असलेल्या विष्णूपुरी येथील होरायझन शाळेमध्ये कृषी सहायक पदासाठीची परीक्षा होती. या परिक्षेस मुक्ता देशमुख यांचे पती गजानन देशमुख हे परीक्षा केंद्रावर त्यांना सोडण्यासाठी आले होते.परंतु परीक्षा सुरु होवून काही मिनिटे झाली असताना परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनाने त्यांना प्रवेश नाकारला. परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्यामुळे मानसिक तणावातून गजानन देशमुख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.या घटनेचे वृत्त मुक्ता देशमुख यांनी नांदेडमधील आपल्या नातेवाईकांना कळविले. त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आणि गजानन देशमुख यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल होरायझनच्या व्यवस्थापनाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. होरायझन परिसरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखली

नक्षली साहित्य सापडले म्हणून कारवाई नाही : मुख्यमंत्री

नागपूर,दि.23 : कुणा कडेही नक्षलवादाचे साहित्य सापडले तर अटक करण्याची आवश्यकता नाही, अशी अटक करायची वेळ आलीच तर सर्वप्रथम मलाच करावी लागेल, कारण मी सुद्धा तसे साहित्य वाचलेले आहे. परंतु ज्यावेळी देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळतील तर त्याच्यावर कारवाई करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने ते अधिकार दिलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन काम करणार नाही. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा विचारासाठी संविधानाच्या विरोधात काम करणार नाही, असे आश्वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारला मराठी नाट्य संमेलन कार्यक्रमात दिले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशिमबाग मैदानावरील राम गणेश गडकरी नाट्य नगरी येथे आयोजित कार्यक्रमाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, प्रफुल्ल फरकासे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर सातत्याने चर्चा होते,ती चर्चा होत राहावी. या देशाच्या मुळ रक्तातच सहिष्णुता आहे. या देशामध्ये एकदाच १९७५ साली अभिव्यक्ती च्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी देशाने इतक्या जोरात त्याला प्रत्युत्तर दिले. त्यावेळी सर्वात बलाढ्य शक्ती देखील उलथवून टाकण्याच काम या देशातील लोकांनी केले.या देशाच्या रक्तातून सहिष्णुता कुणीही काढू शकत नाही. सहिष्णुता हा आमचा विचार आहे,आचार आहे. जगाचा पाठीवर इतका सहिष्णू देश ज्यांच्यावर इतकी आक्रमणे झाली, ती आम्ही पचवले. त्यांना आमच्या संस्कृतीत सामाहून घेतले. जगाच्या पाठीवरून ज्यांना हाकलले गेले त्यांना आम्ही स्थान दिले. जगाने ज्यांना बहिष्कृत केले त्यांनाही सामाहून घेण्याची आमची संस्कृती आहे. त्यामुळे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही.

Saturday 23 February 2019

पुलवामा आतंकी हमले के जखमी जवानो के लिये आर्थिक मदत का संकल्प

देवरी: २३ 
पुलवामा आतंकी हमले मे जखमी जवानो के लिये रक्तदान का आयोजन किया गया जहाँ लाल बहादुर शास्त्री जी के जय जवान जय किसान नारे का परिचय देते हुए नवयुवक किसान गणेश मंडल देश उपर आई ये सबसे बड़ी आपदा जिसको देश कभी भूल नही सकता ऐसे वक्त उन सभी जवानो के परिवारो के साथ पूरा देश खडा है । इसका परिचय देते नवयुवक किसान गणेश मंडल ने रक्तदान और उन सभी शहीदो को श्रधांजलि अर्पित कर पूरे नगर कैंडल रैली की ।गोरतलब है की वर्ष 2016 मे भी उरी आतंकी हमले मे शहीद हूए जवानो के परिवारो को नवयुवक किसान गणेश मंडल देवरी नगर ओर से आर्थिक सहयोग किया उक्त समय आया हुआ दीपावली का त्योहार भी उन्होंने ने नही मनाया था ये आपदा भी उससे कम नही है इसीलिए इस वर्ष भी नवयुवक किसान गणेश मंडल पूरे देवरी नगर से आर्थिक सहयोग संकलन कर उन शहीदो के घर जाकर उनसे आत्मीयता व्यक्त कर उन्हे आर्थिक सहयोग प्रदान करने का संकल्प किया है।

धानाला बोनस सेंदूरवाफा येथे जाहीर करणार- देवेंद्र फडणवीस

तिरोडा,दि.23- धानाला बोनस आणि  मासेमारांना मदत तिरोडा येथे नाही तर मी सेंदुरवाफा येथील सभेत जाहीर करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी तिरोडा येथे विविध कामांच्या भूमिपुजन सोहळ्यात बोलताना केले.
यावेळी केंद्रीय जहाजबांधणी मंत्री ना. नितीन गडकरी आणि स्थानिक आमदार विजय रहांगडाले उपस्थित होते. याप्रसंगी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 सह विविध रस्ते आणि बांधकामाचे भूमीपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तिरोडा येथे जाहिर न करता सेंदुरवाफ्याच्या सभेत करणार असल्याचे सांगत आता मुख्यमंत्री तिथल्या सभेत कोणता राजकीय बॉंबगोळा टाकतात, यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील निवडणुक विभाग सुस्त

मतदार नोंदणीचे अर्ज करूनही यादीत नाव येत नसल्याच्या तक्रारीत वाढ
बीएलओ म्हणतात, अधिकारीच दूर्लक्ष करतात

देवरी,दि.23-  भारतीय निवडणूक आयोग हे सार्वत्रिक निवडणुका घेण्याअगोदर मतदार याद्या अद्यावत करण्याची मोहीम राबवित असते. परंतु, गोंदिया जिल्ह्यातील निवडणुक विभागातील अधिकारी कर्मचारी याविषयी किती गंभीर आहे, याची प्रचिती मतदारांना वेळोवेळी अनुभवायला मिळते. मतदार नोंदणीचे अर्ज बीएलओ मार्फत निवडणुक विभागाकडे सोपविले जातात. परंतु, नवमतदारांचे नाव यादीत समाविष्ठ केले जात नाही. तसेच मतदारांचे नाव सुद्धा गाळले जात नाही. असा आरोप  आता होऊ लागला आहे. परिणामी, आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देऊन मरगळलेल्या यंत्रणेला वठणीवर आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात दरवर्षी 1 जानेवारी या दिनांकाला अर्हता मानून मतदार याद्या पुनर्परीक्षणचे कार्य हाती घेण्यात येते. याविषयी मतदाराना जाणीक करून देण्यासाठी जाहिरातींसह शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार केला जातो. बुथ पातळीवर अनेक नवीन मतदार नमूना 6 मध्ये अर्ज करून आपल्या नावाची नोंदणी बीएलओ कडे करीत असतात. असे असताना संबंधितांचे नाव मतदार यादीत येणे अपेक्षित असते. मात्र, एवढी प्रक्रिया करून देखील अनेकांची नावे यादीतून गायब राहतात. यासंबंधी काही स्थानिक बीएलओंकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही आपली कामे करून ती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात जमा करतो. तरी नावे यादीत समाविष्ठ न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही पुढील प्रक्रिया होत नसल्याचे अनेक बीएलओंचे म्हणणे आहे. याशिवाय मतदारांची नावे कमी करण्याचे काम सुद्धा होत नसल्याची माहिती आहे. परिणामी, अनेक नवमतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतात.
नवमतदारांमध्ये अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणानिमित्त त्यांना शहराचे ठिकाणी गावापासून लांब राहावे लागते. त्यामुळे त्यांना सदर प्रक्रिया करण्यासाठी वारंवार गावाला जावे लागत असल्याने त्यांच्यात कमालीच संताप निर्माण झाला आहे.
भारताचे निवडणुक आयोग कोणीही आपले लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी कितीही कष्ट उपसत असले, तरी अधिकाऱ्याच्या हलगर्जी पणामुळे मतदार यादीची पुनर्रचना वा पुनर्परीक्षण योग्यरीत्या होताना दिसत नाही. या प्रकरणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, यासंबंधी देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे यांच्याशी भ्रमणध्वणीवर संपर्क केला असता  तो होऊ शकला नाही.

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकास २५ हजाराची लाच घेतांना अटक

गडचिरोली,दि.२३ः-चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक प्रकाश दडमल यांना २५ हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारला ताब्यात घेतले.
तक्रारदार संस्थेला धान खरेदी केंद्राचा अधिकार पुढच्या कार्यकाळात कायम ठेवण्यासाठी संचालक प्रकाश दडमल यांनी ३० हजाराची लाच मागितली होती.परंतु तक्रारदारास लाच ेदेण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदविली त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर २२ फेबुवारीला सापळा रचून कारवाई करण्यात आली.यात २५ हजार रुपये स्विकारतांना ताब्यात घेण्यात येऊन आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री महोदय पीक विम्याची रक्कम कधी देणार

तिरोडा, दि.23 : सन २०१७ च्या खरीप हंगामाकरीता कृषी विभागाकडून रिलायन्स विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा काढण्यात आला. त्यातच गंभीर स्वरूपाचा दुष्काळाशी सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. यासंदर्भाची पाहणी कृषी विभाग व विमा कंपनीकडून करण्यात आली. त्यातच राज्य शासनाकडूनही दुष्काळ जाहीर करण्यात आले होते. मात्र, दीड वर्षाचा काळ लोटूनही अद्यापपर्यंत तालुक्यातील नवेझरी येथील महेंद्र भांडारकर या शेतकर्याला विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही.
यासंदर्भात संबंधित विभाग टाळाटाळची भूमिका अवलंबित आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी भांडारकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्यानिमित्त साहेब! विम्याचा लाभ केव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर विमा कंपनी व शासन शेतकर्यांच्या आत्महत्यांची प्रतीक्षा करीत आहे काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला तालुक्यातील नवेझरी येथील शेतकरी महेंद्र भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१७ मध्ये कृषी विभागाकडून पीक विमा उतरविण्याचा तगादा लावण्यात आला होता.दरम्यान मालकीच्या १.२५ हेक्टर आर धानपिकांच्या जमिनीसाठी ९२५ रुपये रोख जमा करून ३१ जुलै २०१७ रोजी कृषी सहायकांच्या उपस्थितीत विमा उतरविण्यात आला होता. मात्र,तोच वर्ष आम्हा शेतकर्यांसाठी दुष्काळाचा ठरला.गंभीर स्वरूपाचा दुष्काळ ठरल्याने मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी झाली असतानाही विमा कंपनीकडून भरपाई मिळेल,अशी आशा पल्लवित होती;परंतु २ वर्षांचा काळ लोटूनही रिलायन्स विमा कंपनीकडून आपणास विम्याची रक्कम मिळालेली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा सातत्याने करीत असतानाही अधिकारी टाळाटाळची भूमिका अवलंबित आहेत. या प्रकाराने विमा कंपनीकडून शासनामार्पâत शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली काय? असा प्रश्न संतापलेल्या शेतकरी भांडारकर यांनी केला आहे. आज (दि.23) राज्याचे मुख्यमंत्री तिरोडा येथे भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त दौर्यावर येत आहेत.किमान यानिमित्त का होईना आढावा घेवून विमा संदर्भात न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी महेंद्र भांडारकर यांनी व्यक्त केली आहे.

लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या रागाने सभापतीने फोडले काच, फेकले साहित्य


अर्जुनी मोरगाव,दि.23 : कार्यालयीन वेळेत अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहात नाही, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात, समज देऊनही यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारऱ्यांच्या कार्यपध्दतीत कसलाच फरक पडत नसल्याचे बघून संतापलेल्या पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी चक्क आपला राग (दि.22) शु्क्रवारला कार्यालयांच्या साहित्यांची नासधूस करून व्यक्त केला. लोकप्रतिनिधींना जनतेची कामे करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातच कर्मचारी व अधिकारी हे आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसतील तर राग ही येतो. परंतु, लोकप्रतिनिधींनी तो राग अशापध्दतीने काढणे कितपत योग्य, अशा चर्चांनाही आता उधाण आले आहे. सभापतींनी केलेला प्रकारही अशोभनीय आहे. या घटनेमुळे अर्जुनी मोरगाव पंचायत समितीसह नगरात एकच खळबळ उडाली.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदावर अरविंद शिवणकर आरूढ झाल्यानंतर त्यांनी कार्यालयीन व्यवस्थेत सुधारणा आणण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. नागरिकांच्या सनदीनुसार यंत्रणेने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुरुप यंत्रणेकडून कामाची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कर्तव्यात कामचुकारपणा दाखविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी वारंवार दिला. एवढेच नव्हेतर अनेक वेळा सभापती शिवणकर यांनी शाळा, पंचायत समिती कार्यालयातील विविध विभागांना भेट देऊन कर्तव्याला बुट्टी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचार्ऱ्यांवर शासकीय पध्दतीने कारवाई ही केली. असे असतानाही कर्मचाऱ्यांच्या वर्तणूकीत कसलाही बदल घडून आलेला नाही. या बाबीचा संताप व्यक्त करण्यासाठी शिवणकर यांनी वेगळीच भूमिका घेतली. सभापती शिवणकर हे दोन दिवसापूर्वी प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेले होते. तिथून शुक्रवारला (दि.२२) ते परतले. दुपारी १ ते १.३० वाजता सुमारास सभापती शिवणकर कार्यालयात उपस्थित होते. मात्र, त्यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मध्यान्हाची वेळ होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी २ वाजेनंतर कर्तव्यावर उपस्थित होतील, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली. त्यानंतरही दुपारी २.३० वाजेची वेळ लोटूनही कृषी विभाग, लेखा विभागातील कर्मचारी हजर नसल्याचे बघून त्यांनी कार्यालयातील खुर्च्या, टेबल अस्तव्यस्त केले. एवढेच नव्हे तर टेबलावरील काच फोडून संताप व्यक्त केला. एवढ्यावर न थांबता सभापती शिवणकर यांनी अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यासंबधीचे पत्रही जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी व उपमुख्य कार्यपालन अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिले असून कारवाई न झाल्यास 25 फेबुवारीला पंचायत समितीला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...