Sunday, 17 February 2019

'बीएसएनएल' सुरूच राहणार


BSNL

मुंबई,दि.17 - बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) बंद करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. "बीएसएनएल'च्या सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजले जात आहेत, अशी ग्वाही महाव्यवस्थापक पीयूष खरे यांनी शुक्रवारी दिली.
"बीएसएनएल' बंद होणार असल्याच्या काही वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्या विपर्यस्त आहेत. सरकारसमोर "बीएसएनएल' बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे महाव्यवस्थापक खरे यांनी स्पष्ट केले. "बीएसएनएल'च्या व्यापक पायाभूत सुविधा, ग्रामीण भागात दूरपर्यंत पसरलेले जाळे या सामर्थ्याची दूरसंपर्क खात्याला जाणीव आहे. "बीएसएनएल'च्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव दूरसंपर्क खाते लवकरच निश्‍चित करणार आहे. त्यावर डिजिटल कम्युनिकेशन कमिशन विचार करेल, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...