Monday, 25 February 2019

काँग्रेसचा देवरी उपविभागीय कार्यालयावर धडकला मोर्चा



देवरी,दि.२५ ः-देवरी तालका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आज २५ फेब्रुवारीला शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षीत बेरोजगार व ट्रॅक्टर संघाच्या सदस्यांचा येथील परसटोलावरून मार्गभ्रमण करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करा, वर्ष २0१५-१६ मध्ये जाहीर केलेल्या ८४ गावांचा दुष्काळ निधी त्वरित वाटप करा, वर्ष २0१७-१८ मध्ये कोरड्या दुष्काळाची हेक्टरी २५ हजार रूपये मदत, शेतकर्‍यांना दुष्काळ निधी व पीकविम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, डिमांड भरलेल्या शेतकर्‍यांना वीज कनेक्शन त्वरित देण्यात यावे, अतिक्रमणधारकांचे थांबलेले पट्टे त्वरित देण्यात यावे, तसेच ग्रामपंचायत मिसपिरी व पिपरखारी येथील लोकांना जन्म-मृत्यूची नोंदणी उपलब्ध करून देण्यात यावी, रेतीघाट लिलाव करण्यात यावे, या मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात गोंदिया जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम बाबा कटरे, माजी जिप अध्यक्ष टोलसिंग पवारन, माजी आ. रामरतन राऊत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, उषा शहारे, राधेश्याम बगडीया, दीपकसिंह पवार, माधुरी कुंभरे, संगीता भेलावे, लखनी सलामे, नरेंद्र मडावी, वसंत पुराम,तालुका कॉंग्रेवचे अध्यक्ष संदीप भाटीयासह मोठ्या संख्येने शेतकरी,शेतमजुर बेरोजगार युवक सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...