गोंदिया,दि.18- सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे कोयापुनेम महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी या तीर्थक्षेत्रासा पर्यटनाचा अ दर्जा देत असल्याचे जाहीर केले. यासाठी या क्षेत्राचा विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना ना. फडणवीस म्हणाले की, कोयापुनेम निमित्त कचारगड येथे वर्षानुवर्षेपासून यात्रा भरत आहे. या यात्रेला येण्याचे भाग्य मला लाभले. यामुळे गोंड समाजाला चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल. राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर हे सुद्धा गोंड राज्याने वसविले आहे. या शहराची नगररचना सुमारे 300 वर्षापूर्वीची आहे. आदिवासी समाजाने जर जल, जमीन आणि जंगल यांचे संवर्धन केले नसते तर आपण प्रदुषणाने होरपळून निघालो असतो. गोंडी संस्कृती ही अतिप्राचीन असून तिचे जतन करण्यासाठी आदिवासी समाजावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यार असल्याचेही ना. फडणवीस म्हणाले.
विकास आराखडा तयार करा- ना. नितीन गडकरी
या क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्यशासनाने त्वरित विकास आराखडा तयार करावा. रेल्वेमुळे रखडलेला कॅनलचा मार्ग मी मोकळा करून देईन, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. प्रत्येक गावात वीज आणि गरीबाला घर या न्यायासाठी आम्ही साडेतीन कोटीचा निधी मंजूर केला. एकही आदिवासी उपचारापासून वंचित राहणार नाही, याभागात उद्योग यावे आणि तणसापासून गॅस तयार करण्याचे प्रकल्प या भागात उभारले जातील, असे आश्वासन ना. गडकरी यांनी यावेळी बोलताना दिले.
2014 पूर्वी हा क्षेत्र उपेक्षित होता- आ. संजय पुराम
गेल्या ३५ वर्षापासून या भागाकडे कोणीही लक्ष दिले नाही. २०१४ पासून कचारगड या पर्यटन क्षेत्राच्या विकासाला सुरवात झाली. येथे येणारे पहिल्याच मुख्यमंत्री आणि केंद्रिय मंत्री आले आहेत. या मतदार संघातील कुवाढास नाल्यावर प्रकल्प साकार करण्यासाठी १०० कोटी द्या , अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. या प्रकल्पामुळे या भागातील ३ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. हा महोत्सव ओरिजिनल गोंडियन समाजाचा पर्व आहे. यामध्ये बोगस आदिवासी सिरनार नाही, असी तंबी आमदार संजय पुराम यांनी दिली.
No comments:
Post a Comment