नांदेड,दि. १६– शहरासह ग्रामीण भागातही शनिवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील १६ तालुक्यासह बाजारपेठ असलेल्या गावात बंद पाळण्यात आला. यावेळी गावागावात रॅली, कँडल मार्च काढण्यात आला. तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी अतिरेक्यांचा पुतळा जाळून निषेध केला.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्या दहशतवादी हल्यात ४२ हुतात्मा जवान झाले. त्या हल्ल्याच्या निषेर्धात शुक्रवारी शहरातील हिंदुतवादी संघटना व युवकांच्यावतीने निषेध रॅलीकडून अश्रुनयनांनी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, बदला घ्या, अतिरेकी पाकड्यांना धडा शिकवाच्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढण्यात आली. बसस्थानक परिसरात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला
अर्धापूर शहरातील हनुमान मंदिर चौक येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. शहिदांचे बलिदान यर्थ जाणार नाही. पाकिस्तानाला जशास तसे उत्तर द्यावे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी कृष्णा देशमुख, बाबुराव लंगडे, प्रमोद मुळे, गुणवंत विरकर, सखाराम क्षिरसागर,योगेश हाळदे, सदाशिव दुधाटे, तुकाराम साखरे, विशाल चिंचोलकर, सोनू परडे, तुकाराम माटे, विलास साबळे, शैलेश लोमटे, गोविंद लंगडे, ज्ञानेश्वर माटे, रमाकांत राऊत, साईनाथ येवले, युवराज विरकर, राजकिरण साखरे, ऋतुराज देशमुख, हनुमान फाटेकर, मन्मथ खुरगावकर, साईनाथ लंगडे, शिवप्रसाद कापसे, अभि कापसे, प्रसाद बुटले, शुभम इंगळे, विशाल देशमाने, राजेश पवार, शुभम गुरूबनवार यांच्यासह शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निमगाव (ता.अर्धापूर) येथे जाहीर निषेध करण्यासाठी येथील शेतकरी, युवक व नागरिकांनी अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात देशासाठी बलीदान देणाऱ्या या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी आपण एकजूट होऊन त्यांच्याप्रती सद्भावना दाखवल्या. यावेळी पोलीस पाटील कान्होजी मोळके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कल्याण मोळके, पत्रकार दिगंबर मोळके, देवराव कांबळे, कृष्णा आडे, गजानन राठोड, जगदीश रामावत, तानाजी कांबळे, कृष्णा सोळंके, चंद्रभान जगताप, शिवाजी मोरे, शंकर मोळके, रंगनाथ घोरपडे, नागोराव गोमासे, नथुजी धोंगडे, विष्णू मोळके, दत्तराव खटके, बालाजी राठोड, बजरंग मोळके, नागोराव जगताप, रमेश चव्हाण, अजय ठाकूर, शेख उस्मान, विठ्ठलराव तेली, खंडू नरोटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मालेगाव (ता. अर्धापूर) पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना मालेगाव (ता. अर्धापूर) येथील युवकांनी १५ फेब्रुवारीला सकाळी मालेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध केला. तर संध्याकाळी गावातून कॅन्डल मार्च काढून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. १६ फेब्रुवारीला मालेगाव पत्रकार संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी चौकात हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकार संजय पाटील इंगोले, कृष्णा पाटील इंगोले, अमोल जोगदंड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, भाजपचे बालाजीराव मरकुंदे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष केशवराव पाटील इंगोले, युवा सेनेचे गजुभाऊ इंगोले, संभाजी ब्रिगेडचे गजानन इंगोले, ग्रामपंचायत सदस्य देवा इंगोले, प्रमोद इंगोले, सुदर्शन वाघमारे, संतोष कदम, शंकर कुलकर्णी, संदीप इंगोले, ज्ञानदीप इंगोले, अविनाश इंगोले, सतीश इंगोले, संकेत इंगोले, साई कामेवार, अशोक पाटील इंगोले, अनिल पाटील, प्रदीप पाटील, नागेश इंगोले, राजू इंगोले, साई इंगोले, आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देऊन आपली प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवली. शैक्षणिक संस्था, खासगी क्लासेस बंद ठेवण्यात आले.
No comments:
Post a Comment