Saturday, 16 February 2019

नानी मॉं का मायरा कार्यक्रम आजपासून

गोंदिया, दि.१६: मनोहरभाई पटेल अँकडमीतर्फे राधा स्वरूपा जया किशोरी यांच्या नानी मॉं का मायरा कार्यक्रम शनिवारी दि.१६ पासून स्थानिक सर्कस मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. खा. प्रफुल्ल पटेल व मनोहरभाई पटेल अँकडमीच्या अध्यक्षा वर्षा यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाविकांना पोहोचण्यासाठी शहरातील विविध भागात नि:शुल्क बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता बससेवा उपलब्ध राहणार आहे. बससेवा उपलब्ध राहणार आहे. अवंतीबाई चौक, छोटा पाल चौक, गायत्री मंदिर, कुडवा नाका, मनोहर कॉलनी, वसंत फाईन आर्ट, एनएमडी महाविद्यालय, रामनगर येथे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमासाठी दामोरदर अग्रवाल, हुकुमचंद अग्रवाल, चेतन बजाज, साजनदास वाधवानी, जय चौरासिया, सुनील अग्रवाल, दिनेशकुमार अग्रवाल, अजय वडेरा, मनोज डोहरे, प्रेमनारायण चौरासिया, विनोद चौरसिया, अरविंद चौरासीया, सुमीत भालोटिया, सुमीत भालोटिया, अपूर्व अग्रवाल, भुवनेश चौबे, अस्सु दवे, संजय जोशी सजश वर्मा, विजय माने उपस्थित होते. या वेळी आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...