Saturday, 16 February 2019

४२ कोटी पॅन पैकी, फक्त २३ कोटी आधारशी लिंक

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.16- प्राप्तिकर रिटर्न भरताना आधार कार्ड पॅन कार्डशी जोडणे आवश्यक असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे.
जे प्राप्तिकर रिटर्न फाइल करणार आहेत त्यांना ३१ मार्चपर्यंत आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडावे (लिंक) लागेल. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार आधारची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. त्यानंतर प्राप्तिकर कायदा कलम १३९ एए आणि सीबीडीटीच्या ३० जून २०१८ च्या आदेशानुसार आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारीला आयटीआरसाठी आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे पुनर्निर्देश दिले होते.प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी या महिन्याच्या प्रारंभी म्हटले होते की, फक्त २३ कोटी पॅनधारकांनी आपले आधार पॅनशी जोडले आहे. आतापर्यंत ४२ कोटी पॅन क्रमांक जारी झाले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने दोन व्यक्तींना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आधार पॅन कार्ड लिंक न करता आयटीआर फाइल करण्याची मुभा दिली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने हे पुनर्निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी २६ सप्टेंबर रोजी आधारची घटनात्मक वैधता अबाधित ठेवली होती. मात्र, कोर्टाने बँक खाती, मोबाइल फोन आणि शाळा प्रवेशासाठी आधार जोडणीची अनिवार्यता रद्द केली होती. यूआयडीएआयद्वारे आधार कार्ड भारतीय नागरिकांना दिले जाते, तर १० अंकी पॅन कार्ड प्राप्तिकर विभागाद्वारे व्यक्ती किंवा फर्मसाठी जारी केले जाते. सीबीडीटी प्राप्तिकर विभागाचे धोरण ठरवते.
आधार, पॅन आणि बँक खाते लिंक झाल्यानंतर मिळणार खर्चाची माहिती 
एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड पॅनशी आणि बँक खात्याशी लिंक केल्यास प्राप्तिकर विभागाला त्या व्यक्तीचा खर्च करण्याचा पॅटर्न समजण्यास मदत होईल. सरकारी योजनांचा लाभ थेट बँक खात्यात जमा होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...