देवरी,दि.20- स्थानिक मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात लोकशाही पंधरवाड्याचे औचित्य साधत एका सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या स्पर्धेत सदृढ लोकशाहीवर आधारित पथनाट्या सादर करण्यात आले. सदर प्रस्तुतिकरण प्रमोद जांभूळकर, राहुल नेताम, राहुल चंदनमलागार, हिमांशू शर्मा, दिपाली कुर्वे, पल्लवी बिंझाडे, तेजस्विनी दखने, नेहा कापसे या विद्यार्थ्यांनी केले. दरम्यान, लोकशाही शासनव्यवस्थेवर आधारित पोस्टर स्पर्धा सुद्धा घेण्यात आली, यामध्ये भूमेश्वरी कावळे हिने प्रथम तर गुंजन जैन हिने द्वितीय आणि मंजूषा नंदागवळी हिने तृतीय पुरस्कार पटकाविला. सुशासन या विषयावर घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेत गोकूल किराईबोईर याने प्रथम तर दर्शना शहारे हिने द्वितिय मानांकन पटकाविले. कविता लेखन स्पर्धेत राणी लांजेवार प्रथम आणि शारदा परसगाये द्वितिय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
प्रा. अरुण झिंगरे यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा गंगणे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. परीक्षक म्हणून प्रा. उमेश चव्हाण, प्रा. शुभांगी मुनघाटे, प्रा. भास्कर डोंगरे आणि प्रा. प्रणय पेंदामे यांनी काम पाहिले.
या आयोजनास यशस्वी करण्यासाठी कुलदीप बघेल, दीपकर भोवते, देविका शाहू, टिकेश्वरी सार्वा, क्षमा नान्हे, पुजा बिंझाडे. बंदना नेताम, नुजत पठाण आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment