Friday 22 February 2019

२३ ते २७ कृषी व पलास महोत्सवाचे गोंदियात आयोजन

गोंदिया,दि.२२ :बदलत्या पिरस्थितीत शेतकèयांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे,कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी तसेच त्याना प्रोत्साहन मिळण्यासोबतच प्रयोगशिल व प्रगतिशिल शेतकèयांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन २३ ते २७ फेबुवारीपर्यंत करण्यात आले आहे.गोंदिया-आमगाव मार्गावरील नागपूरे बगीचापरिसरात हे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाईनवाडे व आत्माचे प्रकल्प संचालक qहदुराव चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिली.
या कृषी मेळाव्याचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.पाहुणे म्हणुन खासदार प्रफुल पटेल,मधुकर कुकडे,अशोक नेते,आमदार गोपालदास अग्रवाल,डॉ.परिणय फुके,विजय रहागंडाले,संजय पुराम,कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने,जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,कृषी सहसंचालक रqवद्र भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन गोंदिया-आमगाव मार्गावर करण्यात आले आहे. महोत्सवस्थळी शेतकèयांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. यासाठी कृषी अवजारे, कीटकनाशके यांच्यासह बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. आयोजकांनी याठिकाणी २०० स्टॉलची व्यवस्था केली. यापैकी ४० वर स्टॉल शासकीय,३० कृषि निविष्ठेचे,३० बचत गट गृहपयोगी वस्तुचे,३० स्टॉल बचतगटासाठी,४० स्टॉल धान्यमहोत्सवासाठी,२० स्टॉल खाद्यपदार्थासाठी,३० स्टॉल कृषी तंत्रज्ञान व सिंचनावरील राहणार आहेत.तर या आयोजनात २० स्टॉल हे निशुःल्कक शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी शेतकèयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...