चिचगड,दि.16- स्थानिक संभाजी कॉन्व्हेंट आणि स्व. सुभद्रादेवी इंग्लिस स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सविता पुराम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.पं.सदस्य शाईन सय्यद, वामनराव दामले, पालकसमितीचे अध्यक्ष काळबांधे, छाया हलमारे, संस्थातसचिव भरतराज हलमारे उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी देवरी तालुका पत्रकार संघाचे सचिव सुरेश चन्ने हे होते. यावेळी नागपूरचे डॉ. नितीन शरणागत, अजय टेंभरे, लक्ष्मण कुबडे, ग्राप सदस्य गुलाब मडावी, जुबीन खान आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन उज्वला भोगारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हलमारे यांनी केले. उपस्थितांचे आभार शिल्पा नाईक यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी योगिता कुंभरे, सोनू कुंजाम, नरेंद्र हाडगे, सकून उजवने, अमित हलमारे, लालचंद निकोडे, भास्कर निकोडे, रामरतन निकोडे यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment