गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.18ः- गडचिरोलीजिल्ह्यात उभारण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयासह कठानी नदीवरील पूल व उपविभागीय परिवहन कार्यालयाचे लोकार्पण आणि विविध विकास कामाचे ई भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते विकास, परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारला करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अंबरीशराव आत्राम, खासदार अशोकजी नेते, चिमूरचे आमदार बंटीभाऊ भांगडिया, आमदार रामदासजी आंबटकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, आम डॉ देवराव होळी, आम कृष्णाजी गजबे, माजी आमदार प्रा अतुलजी देशकर, जिप अध्यक्ष योगीताताई भांडेकर, नप च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्धिकी, भाजपचे प्रदेश सदस्य तथा लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.यावेळी अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासह आणि विविध १८ रस्ते आणि १३ पुलांचे मुख्यमंत्री यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
No comments:
Post a Comment