ग़डचिरोली,दि.०४ – जिल्ह्यातील धानाेरा तालुक्यातील लेखा येथील राईसमिलमध्ये मिलिंगकरीता धानाचे पोते घेऊन येणार्या छत्तीसगड राज्यातील मेटॅडोर चालकाने मुरुमगाव जवळील वडगाव वळणरस्त्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना आज (दि.४) घडली.
या अपघातातील मृताचे नाव नथ्थू डूडराम पदा (२५ रा. मोरचूल छत्तीसगड) असे आहे. तर मृतकाचे वडिल डूडराम पदा (५०), देवाजी गावळे (४०) दोन्ही रा. मोरचूल, नोहरू कोमरे (२१) रा. मासब्रास (कांकेर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर लच्चुराम पदा रा. मोरचूल व वाहनचालक समारू हलामी (२५,रा. हथरा /खडगाव)यांना किरकोळ जखमी झाली आहे.
मोरचूल येथील शेतकरी सीजी-०७-सीए ७८२८ क्रमांकाच्या मेटॅडोरने भरडाईकरीता धानाचे पोते भरून धानोरा जवळील लेखा येथील राईस मिलमध्ये आणत होते. दरम्यान धानोरा-मुरूमगाव मार्गावरील वडगाव जवळील वळणावर एका दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात मेटॅडोरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मेटॅडोर पलटले गेले.यात मेटॅडोरमधील धानाच्या पोत्यावर बसलेले चारजण बाहेर फेकले गेले. यामध्ये नथ्थू पदा हा युवक जागीच ठार झाला. तर डूडराम पदा, देवाजी गावळे, नोहरू कोमरे , लच्चुराम पदा, वाहनचालक समारू हलामी जखमी झाले. जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.धानोरा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश बासनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
No comments:
Post a Comment