Monday 18 February 2019

गडचिरोलीतील ओबीसींना मुख्यमंत्र्यांचा 'लालीपॉप'


गोंदिया,दि.18- महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या मागास, नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले होते. हे आरक्षण पूर्वीप्रमाणे 4 टक्क्यावरून 19 टक्के करण्याचा निर्णय राज्यशासन घेणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथील कोयापुनेम महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आज (दि.18) सोमवारी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकांसाठी ओबीसींच्या मतांवर डोळा ठेवत गडचिरोलीतील ओबीसींना लालीपॉप दिल्याचे त्यांच्या भाषणातील एकंदर फटकेबाजी वरून दिसून आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...