Thursday, 14 February 2019

लोहा येथे भरधाव ट्रक चालकाने पादचाऱ्यास उडविले


लोहा, (जि.नांदेड)दि.14- लोहा येथे झालेल्या एका अपघातामध्ये भरधाव ट्रकने पादचाऱ्यास उडविल्याची घटना घडली. यामध्ये पादचाऱ्याच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताची नोंद लोहा पोलिसात करण्यात आली आहे. 
मृताचे नाव  चांद हुजेलखाॅ पठाण  (वय 40 वर्ष ) रा. रायवाडी ता. लोहा असे आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील शनिदेव मंदिराजवळ ट्रक क्रमांक डब्ल्यू बी  25  एच 2509 च्या चालकाने आपले  वाहन निष्काळजी पणाने चालवून पायी जात असलेल्या चांद पठाण याला जोरदार धडक दिली .यामध्ये चांद पठाण हा गंभीर जखमी झाला. जखमीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला. 
लोहा पोलिसांत  या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...