देवरी तालुक्यातील वडेगाव येथील घटना
देवरी,दि.12- राज्यात शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. असाच एक प्रकार देवरी तालुक्यातील वडेगाव येथे काल सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. दरम्यान, देवरी पोलिसांत मर्ग दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव केवलचंद इसूलाल रहांगडाले (वय 70), राहणार वडेगाव असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल सायंकाळपूर्वी मृत केवलचंदला गावात फिरताना लोकांनी बघितले. मात्र, सांयकाळी
त्याने स्वतःच्या राहत्या घरी धाब्यावर जाऊन धोतराच्या साह्याने गळफास घेतल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गावात शोककळा पसरली. या घटनेची तक्रार देवरी पोलिसात करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मृताने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या खिशात सुसाइड नोट लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेमागचे खरे कारण पोलिस तपासानंतर समोर येईल.
No comments:
Post a Comment