Saturday, 2 February 2019

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या विभागीय सहसचिव पदी आशिष रामटेकेची निवड




गोंदिया,दि.०२ः- राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या मुबंई येथे झालेल्यात्रैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सहसचिव(नागपूर विभाग)पदी आशिष रामटेके हे बिनविरोध निवडून आले.सहसचिव पदासाठी आशिष रामटेके यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणुक अधिकारी दिनेश चव्हाण यांनी केली.ही निवडणुक २९ जानेवारीला पार पडली.नविन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा सातारा येथे आयोजित ९ व १० फेबुवारीला १५ व्या अधिवेशनात होणार आहे.
आशिष रामटेके सध्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे गोंदिया जिल्हा सचिव,महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना सहसचिव(विदर्भ),तसेच महाराष्ट्र जुनी पेंशन हक्क संघटना गोंदिया माजी जिल्हाध्यक्ष या पदावर राहिलेले आहेत.शासनाकडे सातत्याने कर्मचारी हितासाठी त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन मागण्यासांठी पाठपुरावा केलेला आहे.आशिष रामटेकेच्या निवडीबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सहसचिव लिलाधर पाथोडे,पाटबंधारे विभागाचे चंदू वैद्य,ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष कमलेश बिसेन,शैलेश भदाने,प्रशांत नवलकर आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...