तिरोडा,दि.23- धानाला बोनस आणि मासेमारांना मदत तिरोडा येथे नाही तर मी सेंदुरवाफा येथील सभेत जाहीर करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी तिरोडा येथे विविध कामांच्या भूमिपुजन सोहळ्यात बोलताना केले.
यावेळी केंद्रीय जहाजबांधणी मंत्री ना. नितीन गडकरी आणि स्थानिक आमदार विजय रहांगडाले उपस्थित होते. याप्रसंगी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 सह विविध रस्ते आणि बांधकामाचे भूमीपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तिरोडा येथे जाहिर न करता सेंदुरवाफ्याच्या सभेत करणार असल्याचे सांगत आता मुख्यमंत्री तिथल्या सभेत कोणता राजकीय बॉंबगोळा टाकतात, यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment