तिरोडा,दि.23 : सन २०१७ च्या खरीप हंगामाकरीता कृषी विभागाकडून रिलायन्स विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा काढण्यात आला.त्यातच गंभीर स्वरूपाचा दुष्काळाशी सामना करावा
लागला. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.यासंदर्भाची पाहणी कृषी विभाग व विमा वंâपनीकडून करण्यात आली. त्यातच राज्य शासनाकडूनही दुष्काळ जाहीर करण्यात आले होते. मात्र, दीड वर्षाचा काळ लोटूनही अद्यापपर्यंत तालुक्यातील नवेझरी येथील महेंद्र भांडारकर या शेतकर्याला विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही.
यासंदर्भात संबंधित विभाग टाळाटाळची भूमिका अवलंबित आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी भांडारकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्यानिमित्त साहेब! विम्याचा लाभ केव्हा मिळणार? असा प्रश्न
उपस्थित केला आहे. त्याचबरोबर विमा कंपनी व शासन शेतकर्यांच्या आत्महत्यांची प्रतीक्षा करीत आहे काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला तालुक्यातील नवेझरी येथील शेतकरी महेंद्र
भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१७ मध्ये कृषी विभागाकडून पीक विमा उतरविण्याचा तगादा लावण्यात आला होता.दरम्यान मालकीच्या १.२५ हेक्टर आर धानपिकांच्या जमिनीसाठी ९२५ रुपये रोख जमा करून ३१ जुलै २०१७ रोजी कृषी सहायकांच्या उपस्थितीत विमा उतरविण्यात आला होता. मात्र,तोच वर्ष आम्हा शेतकर्यांसाठी दुष्काळाचा ठरला.गंभीर स्वरूपाचा दुष्काळ ठरल्याने मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी झाली असतानाही विमा कंपनीकडून भरपाई मिळेल,अशी आशा पल्लवित होती;परंतु २ वर्षांचा काळ लोटूनही रिलायन्स विमा कंपनीकडून आपणास विम्याची रक्कम
मिळालेली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा सातत्याने करीत असतानाही अधिकारी टाळाटाळची भूमिका अवलंबित आहेत. या प्रकाराने विमा कंपनीकडून शासनामार्पâत शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली काय? असा प्रश्न संतापलेल्या शेतकरी भांडारकर यांनी केला आहे. आज (दि.23) राज्याचे मुख्यमंत्री तिरोडा येथे भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त दौर्यावर येत आहेत.किमान यानिमित्त का होईना आढावा घेवून विमा संदर्भात न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी महेंद्र भांडारकर यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment