Friday, 22 February 2019

बावनकुळेंच्या मंचावरच भाजप माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भंडारा,दि.22 : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली. 

उपस्थितांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा शहर पाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन आणि कामगार कल्याण विभागाचा लाभ वाटप सोहळा दशहरा मैदानात आज शुक्रवारी (22 फेब्रुवारी) आयोजित होता. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सोहळा सुरू असताना  माजी नगरसेवक आणि माळी समाजाचे नेते अरुण भेदे अचानक मंचावर आले. पालकमंत्र्यांच्या समक्ष अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी त्याला पकडून व्यासपीठावरुन खाली आणले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...