देवरी,दि १८ - जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्हात जैश-ए-मोहम्मद च्या अतिरेक्यांनी घडविलेल्या स्फोटात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी देवरी येथे आज (दि.१८) सोमवारी ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले होते.
देशभर संतापाची लाट , बदला घेण्याची तीव्र भावना ,शाहिदाचे बलिदान व्यर्थ न जाओ या अशी भावना व्यक्त करत नागरिकांना शहिगांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पाकिस्तान प्रायोजित या भ्याड हल्लाचे तीव्र निषेध सुद्धा नोंदविण्यात आला.
शहरातील गणेश चौक,मस्कऱ्या चौक व नगरपंचायत पटांगन या ठिकाणी मेणबत्ती पेटवुन शहरात रॅली काढण्यात आली.
शहिद सीआरपीएफ च्या पथकावर झालेल्या बॉम्ब स्फोटात 44 जवान शहीद झाले. नगरपंचायत देवरी, गणेश चौक व मश्कर्या चौक च्या वतीने त्या शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली.
कार्यक्रमात देवरीच्या नगराध्यक्ष कौशल कुंभरे, मुख्याधिकारी चिखलखुंदे, , आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवरीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment