Thursday, 14 February 2019

देवरी नजीक झालेल्या इनोवा-ट्रक अपघातात २ जण ठार

देवरी,दि. १४- येथून ८ किमी दूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील मासूलकसा घाटात रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या इनोवा कार आणि ट्रकमध्ये  झालेल्या अपघातात २ जण जागीच  ठार  तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये रोशन ठकरांनी  (वय ४५ ), मीरा भगवान ठकरांनी  (वय ६८) दोन्ही राहणार गोंदिया यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सपना रोशन ठकरांनी (वय ४०) चंचल रोशन ठकरांनी (वय १७) हर्ष रोशन ठकरांनी (वय १२) आणि इनोव्हा चालक (नाव कळू शकले नाही) यांचा समावेश आहे.
सविस्तर असे की, गोंदिया येथील रहिवासी असलेले ठकरानी कुटुंबीय हे आपल्या इनोवा कार क्र.एम एच 35 एजी 1688 या कारने रायपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, मासूलकसा घाटात पोचताच वाहनचालकाचा आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये इनोवा कार चकनाचूर झाली असून ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊल उलटला. यामध्ये रोशन ठकराणी आणि मीरा ठकरानी यांचा जागीच जीव गेला तर इतर जण गंभीर जखमी झाले. जखमींना देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी सर्व जखमींना नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहीती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. वृत्त लिहीपर्यत देवरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...