
सविस्तर असे की, गेल्या 9 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंची निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना. कमलनाथ यांचे सह विविध क्षेत्रातील अनेक गणमान्य व्यक्ती हजर होते. यावेळी बोलताना ना. कमलनाथ यांनी महाराष्ट्रात राहून गोंदिया जिल्ह्याचा विकास झाला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेशशी जोडल्यास आम्ही चांगला विकास करू, असे प्रतिपादन केले होते. त्याला प्रतिउत्तर देताना शिवसेनेने त्यांच्यावर शरसंधान साधले आहे. श्री शिवहरे यांनी मध्यप्रदेशचमध्ये भाजपच्या नाकर्तेपणामुळे कॉंग्रेसला सत्ता मिळाली. त्यामुळे ना. कमलनाथ यांच्या डोक्यात हवा शिरल्याचे दिसत आहे. त्यांनी अखंड महाराष्ट्राला तोडण्याचे स्वप्न पाहू नये. अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकविला जाईल. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे. याउलट बालाघाट आणि छिंदवाडा हे दोन जिल्हे मध्यप्रदेशमध्ये चांगल्या स्थितीत नाहीत. सीपी अण्ड बेरारच्या काळात हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाळ असणारे जिल्हे आहेत. ना. कमलनाथ यांनी हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रात सामील करून आफल्या परिपक्वतेचा परिचय द्यावा, असे आवाहनसुद्धा शिवहरे यांनी केले आहे.
दरम्यान, केवळ ना. कमलनाथच नाही तर कोणीही महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, अन्यथा तसे करणे त्यांना नक्कीच महागात पडेल, अशी तंबी देण्यास श्री. शिवहरे विसरले नाहीत.
No comments:
Post a Comment