Wednesday, 20 February 2019

१० टक्के द्या अन,लपा विभागाचे काम मिळवा,निविदेप्रकियेवर शंका

गोंदिया,दि.20-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लुघपाटबंधारे विभागातर्गंत जिल्हा निधीतील कामांना मंजुरी देण्यात आली असून सुमारे ७ कोटी रुपयाची १०० च्यावरील कामांचे वाटप जिल्हा परिषद सदस्यांना करण्यात येत आहे.प्रत्येकी ४० टक्के कामे ही काँग्रेस व भाजपच्या सदस्यांना तर २० टक्के कामे ही राष्ट्रवादीच्या सदस्यांना द्यायचे या धोरणानुसार कामांचे वाटप होत असून ज्यांना हे काम हवे त्यांना १० टक्के द्या अन कामाची प्रशासकीय मंजुरीचे पत्र घेऊन जा असा अलिखित फतवाच लघुपाटबंधारे विभागातून निघाल्याच्या चर्चांनी बाजार गरमले आहे.
त्यातही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिगर आदिवासी योजनेंतर्गत ३ लाखाच्या खाली असलेल्या १ कोटी ९१ लाख ६ हजार रुपये किमतीचे ६४ कामे ही मजुर सहकारी संस्थाना वाटप करण्यासाठी बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले.तर जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत २२ कामांचीही निविदा काढण्यात आली असून या निविदा एकाच कंत्राटदाराला कशी मिळेल याचेही नियोजन होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सोबतच ८७ कामेही वाटपाच्या प्रतिक्षेत आहेत ७ कोटीच्या कामापैकी फक्त साडेचार कोटींच्याच कामाची माहिती  सदस्यांना दिल्याची चर्चा असून उर्वरित अडीच कोटीची कामे आपल्याकडे राखून ठेवल्याचे बोलले जात आहे.तर गेल्या चारपाच दिवसापुर्वी गोंदिया मुख्यालय सोडून भंडारा येथे गेलेल्या कार्यकारी अभियंता यांनी तिथे कामाच्या मोजमापपुस्तिकेवरसुध्दा स्वाक्षèया केल्याचे वृत्त समोर आले आहे.जेव्हा मोजमापपुस्तिकेव स्वाक्षरी ही कामाची पाहणी केल्यानंतर करावयाची असते,त्यातही जिल्हा सोडून ही मोजमापपुस्तिका बाहेर गेल्याने थोडा अधिक शंखेला वाव निर्माण झाला आहे.त्यातच सीईओनी या सर्व कामांची एकदा तपासणी गरजेचे झाले आहे.
यापुर्वी एक दोन वर्षात ज्या कोल्हापुरी बंधारे बांधकामाची दुरुस्ती qकवा नव्याने बांधकाम केलेल्या कामांचाही तर पुन्हा समावेश नाही ना.qकवा पाणघाटाच्या नावावर निधीची उचलेगिरी तर होत नाही याबाबत चौकशीची गरज असून पाणीपुरवठा विभागाचा प्रभार असतांना जो निविदा घोटाळा झालेला होता त्याप्रमाणे लपा विभागाच्या निविदा मॅनेज करण्यासाठी घोटाळा होण्याची भिती काही कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...