Saturday 9 February 2019

मुख्यमंत्री कमलनाथ व पाहुण्यांच्या हस्ते १४ गुणवंत विद्यार्थ्यांसह अनेकांचा सत्कार

गोंदिया,दि.०९ - येथील धोटेबंधू विज्ञान  महाविद्यालयाच्या प्रागंणात दरवर्षीप्रमाणे स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने ९ फेब्रुवारी रोजी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या  जयंती समारोहाचे औचित्य साधून गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील १४ प्राविण्यप्रााप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने मुख्यमंत्री कमलनाथ व पाहुण्यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संजय दत्त, उद्योगपती अनिल अग्रवाल, किरण अग्रवाल, मध्यप्रदेशचे मंत्री प्रदीप जायस्वाल, म.प्र. विधानसभेचे उपाध्यक्ष हिना कावरे, खासदार मधुकर कुकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार गोपालदास अग्रवाल, प्रकाश गजभिये, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, रमेश डोंगरे, विलासराव श्रृंगारपवार, माजी खा.विश्वेश्वर भगत, माजी मंत्री नाना पंचबुद्धे,आ. संजय उईके, माजी आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, माजी आ. दिलीप बन्सोड, अकादमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल, हरिहरभाई पटेल, पुष्पा कावरे उपस्थित होते. सुरवातीला मनोहरभाई पटेलांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व पाहुण्यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार 

सुवर्णपदकाने करण्यात आला.
सोबतच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. सत्कारमूर्ती मध्ये गुजराती नॅशनल हायस्कूलमधून दहावीमध्ये प्रथम स्थान प्राप्त मेघा मुकेश बिसेन, जिल्ह्यातून दहावीमध्ये प्रथम स्थान प्राप्त जी.एम.बी. हायस्कूल अर्जुनी-मोरगावची अवंती अक्षय राऊत, शांताबेन मनोहरभाई पटेल ज्युनियर कॉलेलमधून बारावीमध्ये प्रथम आलेल्या समर्थ रुपेश वरु, दहावीमध्ये सरसवती ज्युनियर कॉलेज अर्युनी-मोरगाव येथील विद्यार्थी जयंत धरमजी लोनारे, बी.ए.श्रेणीमधून प्रथम आलेली नमाद महाविद्यालयाची विद्यार्थिनी रक्षंदा दिलीप पशिने, जिल्ह्यातून बी.कॉम. श्रेणीत प्रथम आलेला नमादचा विद्यार्थी संदेश सुनील केडिया, गोंदिया जिल्ह्यातून बीएससी श्रेणीत प्रथम आलेली सी.जे. पटेल तिरोड्याची विद्यार्थिनी कल्पना प्रल्हाद भगत,बी.ई.श्रेणीत प्रथम एमआयटीची विद्यार्थिनी सानिया ताहिर अली हुसैन, भंडारा जिल्ह्यातून दहावीतमध्ये प्रथम वैनगंगा विद्यालय पवनीची विद्यार्थिनी साक्षी सुनील घावले, बारावीमध्ये प्रथम नानाजी जोशी ज्यु.कॉलेज शहापूरचा विद्यार्थी रितेश पुरुषोत्तम हर्षे, बी.ए. श्रेणीत प्रथम मनोहरभाई पटेल कॉलेज साकोलीचा विद्यार्थी गुलशन विजय शहारे, बी.कॉम श्रेणीत उत्तीर्ण जे.एम. पटेल कॉलेज भंडाराची विद्यार्थिनी निलीमा शांताराम चौधरी, बी.एस.सी. श्रेणीत प्रथम जे.एम. पटेल कॉलेज भंडाराचा विद्यार्थी प्रज्वल राकेश राजपूत, बी.ई.श्रेणीत प्रथम आलेला एमआयटी शहापूरची विद्यार्थिनी वैष्णवी रमेश शेंडे यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...