गोंदिया,दि.२२ : आदिवासी नगारची समाज हा विकासापासून कोसो दूर आहे. या समाजातील मुला-मुली अद्यापही शिक्षणापासून वंचित आहेत. या समाजाने आपल्या समाजाच्या विकासाकरिता एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी केले. .
अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीतर्फे २० फेब्रुवारीला आयोजित आदिवासी नगारची संस्कृती महोत्सवात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज, वीर बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शिवप्रसाद बरले हे होते तर अतिथी म्हणून मधुकर उईके, राजकुमार हिवारे, विजय राठीपीटाने, भुवन बुरले, रूकेश नगारची, रोशन पडवार, विनय नागरे, राजू मिरचुले, कुंजीलाल कुमरे, बसंत सिंहमारे, सुधाकर नगारची, वनवास हिवारे, घनश्याम नगारची, विजय राठीपीटने, रामभरोश अकलगुनिया आदी उपस्थित होते.यावेळी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे संचालन राजकुमार हिवारे यांनी केले तर आभार भुवन बुरले यांनी मानले. यशस्वितेसाठी गुलशन कुमरे, मोनू नगरे, तरुण सोरले, लल्ला सिंहमारे, सतीश सोरले, रोहित सोरले, रोहित मिरचुले, हिमांशू हिवारे, आशुतोष सिंगमारे, सोनू बुरले, लालू सोरले, रोशन सावतवान, रवी येरके, वामन शिकारे, रामप्रसाद पंधराम, रोशन नैताम, संजय परतेती, हेमा सिंहमारे, शकुंतला कुमरे, निरंजन मिरचुले, लता सोरले, कन्हैयालाल सोरले, निलास राठी, नरेंद्र नागरे, ओमप्रकाश सोरले, अनिल पडवार, सावरलाल सिंगमारे आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment