Wednesday, 20 February 2019

ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून विद्यार्थी ठार

भंडारा,दि.19 : परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी किटाडी येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. चेतन विनायक जवंजाळ रा.मिरेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने गावात तणाव असून मुख्याध्यापक, शाळेचे संचालक व ट्रॅक्टर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन आंदोलन सुरु आहे.
माहितीनुसार, चेतन हा मिरेगाव येथील शुक्राचार्य विद्यालयाचा इयत्ता नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. बारावी व दहावीचे परीक्षा केंद्र मुंडीपार येथे असल्याने शाळेच्या शिक्षकांनी ट्रॅक्टरद्वारे डेक्स बेंच पाठविण्याचे ठरविले. सदर साहित्य पोहचवून देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मुंडीपार येथील शाळेत साहित्य उतरवून ट्रॅक्टरद्वारे परत येत असताना किटाडी येथे अचानक चेतन हा ट्रॅक्टर चालकाजवळील जागेहून खाली कोसळला. यात ट्रॅक्टरच्या चाकात सापडल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला. घटनेची माहिती गावात होताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. जोपर्यंत मिरेगाव येथील मुख्याध्यापक व संचालक घटनास्थळी येऊन जाहीर माफी मागत नाही व त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. वृत्त लिहिपर्यंत आंदोलन सुरुच असून घटनास्थळी आमदार बाळा काशीवार, तहसीलदार तथा लाखनी, साकोलीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...