Tuesday, 5 February 2019

गुरुजींनी कामावर निस्सीम प्रेम करणारी माणसं घडविली : डॉ. मालगावे

आमगाव,दि.05ःःसंपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे जे चित्र दिसत आहे. त्यामागे मानकर गुरूजी यांचे सर्मपण असून कामावर निस्सीम प्रेम करणारी माणसं त्यांनी घडविली. तसेच आमगावला शैक्षणिक राजधानी बनविण्याचा संकल्प केला. त्यांच्या या दृढ निश्‍चयातूनच भवभूति शिक्षण संस्थेची स्थापना झाली. असे मत डॉ. प्रकाश मालगावे यांनी र्शद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरूजी यांच्या जयंती समारोहात व्यक्त केले.
ते व्यासपीठावरून प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत संघचालक रामभाऊ हरकरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे यांच्या सह सत्कार मूर्ती बबनसिंह ठाकूर, गेंदलाल कटारे, महेंद्र मेर्शाम, जगदिश अग्रवाल, इंद्रराज बहेकार, आमदार संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष हमीर अल्ताफ,माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, भेरसिंह नागपुरे, नरेश माहेश्‍वरी, हेमंत पटले, संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेश असाटी, उपाध्यक्ष प्रमोद हटकवार, संचालक ढे.र. कटरे, रमेश कावळे, हरिहर मानकर, उर्मिला कावळे, समारोह संयोजक डॉ. श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य भवभूति महाविद्यालय तसेच सर्व घटक संस्थेचे प्राचार्य प्रामुख्याने उपस्थित होते.
भवभूति महाविद्यालयाच्या स्थापने पासून उत्तरोत्तर चढत असलेला महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख त्यांनी सादर केला. भवभूति महाविद्यालयाचे सुवर्णी महोत्सवात पदार्पण होत असल्याचे विधिवत उद््घाटन कुलपति डॉ. काणे यांच्या हस्ते झाले. तसेच मुलीच्या वसतिगृहाचे लोकार्पण यावेळी अतिथींच्या हस्ते झाले. संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. संस्था चालवतांना येणार्‍या अडचणी त्यांनी मांडला. तसेच संस्थेला नावारूपास आणण्यासाठी झटणार्‍या सर्व कर्मठ कार्यकर्त्यांचा व प्रशासकीय कार्य उत्तमपणे बजावणारे डॉ. भुस्कुटे, डॉ. डी.के. संघी, प्राचार्य राऊत, जगदिश शर्मा यांचा यावेळी विशेष उल्लेख केला.
यावेळी भवभूति शिक्षण संस्थेच्या वतीने बबनसिंह ठाकूर, गेंदलाल कटारे, महेंद्र मेश्राम, जगदिश अग्रवाल, इंद्रराजभाऊ बहेकार, भोला गुप्ता यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या समारोहाचे उद्घाटक कुलगुरू डॉ. काणे यांनी यावेळी मार्मिक मार्गदर्शन केले. संस्थेत उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल डॉ. भुस्कुटे, चंद्रकुमार पटले, तसेच क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त भौतिक चांदगावे, सोहिल डोये, रामकला शेंडे यांना गौरविण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे संघी परिवार गोंदियाच्यावतीने तालुक्यातील प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना संघी टॉपर्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठय़ा संख्येने गुरूजींचा चाहतावर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. भुस्कुटे यांनी केले.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. झेड. डी. पठ्ठे, अपर्णा कटरे यांनी केले. आभार प्रा. अनिल जोशी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...