गोंदिया,दि.२७~ः गोंदियाच्या जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ.राजा दयानिधी यांचेही नाव बदलीच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी सुध्दा चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला घेऊन बदल्या होत असल्याचे वृत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सीईओ डाॅ.दयानिधी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचीही चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदावर बदली झाल्याचे वृत्त आहे.
भंडारा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांची बदली मात्र एकाच लोकसभा मतदारसंघात कशी करण्यात आली याबद्दल प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी 3 मतदारसंघ येत असून गोंदियाचा फक्त 1 मतदारसंघ गडचिरोली-चिमूर मतदारसंघात येत आहे. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा व लोकसभा मतदारसंघावर त्या अधिकाऱ्याचा प्रभाव पडता कामा नये, यासाठी स्थानांतरण करण्यात येत असताना श्रीमती साहू या तर पूर्वीपासूनच या मतदारसंघात कार्यरत राहिलेल्या असल्याने त्यांचा प्रभाव पडणार नाही का ? असे प्रश्न पोलिस प्रशासनात चर्चेला आले आहेत.
No comments:
Post a Comment