Thursday 14 February 2019

भाजप सरकार शेतकरीविरोधी-पटोले

तुमसर,दि.14ः-देशात शेतकर्‍यांवरील अन्याय, ओबीसी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, रोजगार, वाढती बेरोजगारीची समस्या कायम आहे. समाजामध्ये मतभेद निर्माण करून संविधानाला संपविण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे. सरकारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. ही सरकार शेतकरी तथा ओबीसी विरोधी आहे, अशी टिका अखिल भारतीय कॉंग्रेस शेतकरी-शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
तालुक्यातील आष्टी जि.प क्षेत्र शाळेच्या पटांगणावर शेतकरी-शेतमजूर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी जि.प उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात भाजपाचे माजी पं.स सदस्य शालीकराम शहारे यांच्या नेतृत्वात अभिनंदन कांबळे, विनायक बोरकर, लालचंद गोलंगे, गोविंदा भलावी, ज्ञानेश्‍वर लाळे, कुशन सहारे, रामनाथ रामटेके, मुन्ना उईके, शामराव चिंडलोरे, रुपलाल गोळगे, वसंत पंधरे, अभय भलावी आदी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच शिवसेना मोहाडी तालुका प्रमुख पवन चौहान यांच्या नेतृत्वात शिवसैनिक ब्रिजलाल गभने, दशरथ बोरकर, रविंद्र वाडवे, बाळकृष्ण टेकाम, गजानन बसिने, धनराज पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे, महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, नगरसेवक बाळाभाऊ ठाकूर, माजी सभापती कलाम शेख, तुमसर तालुका अध्यक्ष शंकर राऊत, विधानसभा निरीक्षक गजानन झंझाड, युवक अध्यक्ष प्रफुल्ल बिसने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...