Friday, 1 February 2019

सुरजागड पहाडावरील जाळपोळ प्रकरणी वरवरा रावसह सुरेंद्र गडलिंगला 11 दिवसांची पोलीस कोठडी

या दोघांनाही गडचिरोली पोलिसांनी १४ दिवस पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ११ दिवसांची कोठडी दिली आहे. राव-गडलिंग यांच्या वकिलांनी मात्र पुणे पोलिसांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल मूळ एफआयआर रद्द करून अटकेतील सर्वांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळणे जवळपास निश्चित झाल्याने त्यांना अन्य गुन्ह्यात अडकविण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. गडचिरोली पोलिसांचा एफआयआर रद्द व्हावा आणि दोघांना जामीन मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत भोसले हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. यापूर्वी साईबाबाला अहेरी पोलिसांनी दिल्लीवरून अटक केली होती. आता तर पहिल्यांदाच या चळवळीचे कट्टरसमर्थक असलेल्या वरवरा रावला पोलिसांनी अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...