Thursday 31 January 2019

नक्षल्यांकडून पेडीगुडमातील बांबू कटाई कामगारांना मारहाण

गडचिरोली,दि.31ः- – वनविकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या बांबू कटाई कामावरील कामगारांना नक्षल्यांनी मारहाण केल्याची घटना काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पेडीगुडम येथील वनविकास महामंडळाच्या मार्कंडा डिव्हीजनमधील कंपार्टमेंट ८९,९०,९१ मध्ये घडली. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.अरूण लक्ष्मण दसमरे (२६) रा. भिवापूर , बसंत धानसिंग वरखडे (४५) रा. जागुल जि. बालाघाट (मध्यप्रदेश) अशी गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत.अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले.
अहेरी तालुक्यातील पेडीगुडम वनविकास महामंडळाच्या मार्कंडा डिव्हीजन मधील कंपार्टमेंट ८९, ९०, ९१ मध्ये स्थानिक नागरिक आणि मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथील ६० ते ७० नागरिकांकडून बांबू कटाईचे काम सुरू आहे. काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बांबू कटाईसाठी मुक्कामी असलेल्या कामगारांपैकी चार- पाच कामगारांना २० ते ३० च्या संख्येत तोंडाला रूमाल बांधून आलेल्या नक्षलवाद्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक, वनपाल घटनास्थळी पोचून जखमींना उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...